Israel Attacks on Gaza: इस्रायली सैन्याने गाझावर विनाशकारी हल्ला केला आहे. या हल्ल्यात मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एपी वृत्तानुसार, गाझामध्ये इस्रायली हल्ला बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळपर्यंत सुरू राहिला. या हल्ल्यांमध्ये मोठ्या संख्येने पॅलेस्टिनी लोक मारले गेले आहेत.
दक्षिण गाझामध्ये झालेल्या हल्ल्यात 70 हून अधिक लोकांचा मृत्यू -
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण गाझा शहरे खान युनूस आणि रफाह आणि उत्तरेकडील शहर बेत लाहिया येथील घरांना लक्ष्य करण्यात आले. तथापि, अद्याप एकूण मृतांची संख्या उघड केलेली नाही. अल जझीराच्या वृत्तानुसार, उत्तर आणि दक्षिण गाझामध्ये पहाटे झालेल्या या हल्ल्यात 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - 2031 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची 'व्हॅलिडिटी' संपणार; तुम्हाला माहीत आहे का, नासा ISSला कसं निवृत्त करेल?
इस्रायल-हमास युद्धबंदीचा भंग -
इस्रायल आणि हमासमधील युद्धबंदी सुमारे एक आठवड्यापूर्वी खंडित झाली. तेव्हापासून इस्रायली सैन्य गाझावर सतत भयंकर हल्ले करत आहे. तीन दिवसांपूर्वी इस्रायलने गाझावर मोठा हल्ला केला होता, ज्यामध्ये 400 हून अधिक लोक मारले गेले होते. इस्रायली बंधकांना सोडण्यात अपयश आल्याने इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हमासवर संतापले आहेत. म्हणूनच, त्याने पुन्हा एकदा आपल्या सैन्याला हमासवर मोठे हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर, इस्रायली सैन्याने उत्तर आणि दक्षिण गाझामध्ये हल्ले सुरू केले आहेत.
हेही वाचा - Happiest Countries In The World: जगातील 10 सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर! अमेरिका नव्हे तर 'हा' देश आहे पहिल्या क्रमांकावर
ही तर हल्ल्यांची सुरुवात आहे - इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू
दरम्यान, बुधवारी गाझामध्ये 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ही तर हल्ल्यांची सुरुवात आहे, असं म्हटलं होतं. सध्या आमचे ध्येय हमासला पूर्णपणे नष्ट करणे आहे. जर हमासने ओलिसांना सोडले नाही तर त्यांना आणखी गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही नेतान्याहू यांनी दिला होता. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, युद्धबंदी मोडल्यानंतर मंगळवारी झालेल्या हल्ल्यात गाझामध्ये 436 लोक मारले गेले, ज्यात 183 लहान मुलं होती.