बँकॉक: थायलंडच्या राजधानीत सोमवारी दुपारी सामूहिक गोळीबाराची घटना घडली. यामध्ये किमान 6 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बँकॉकच्या चातुचक जिल्ह्यातील ‘ओर टोर कोर मार्केट’मध्ये एका 61 वर्षीय व्यक्तीने अचानक गोळीबार केला. तसेच यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, या गोळीबारात 6 जण ठार झाले असून 2 महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने फायथाई फाहोल्योथिन रुग्णालयात हलवण्यात आले.
हेही वाचा - बांगलादेशात तालिबानी फर्मान लागू? महिला-मुलींसाठी नवीन ड्रेस कोड जारी
नेमक काय घडलं?
थैरथ या स्थानिक माध्यमाने बचाव अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, ही घटना दुपारी 12:38 वाजता घडली. बंदूकधारी व्यक्तीने सुरुवातीला मार्केटमध्ये अंधाधुंद गोळीबार केला आणि नंतर बाजारातील एका बाकावर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
बँकॉकमधील मार्केटमध्ये सामूहिक गोळीबार -
हेही वाचा - थायलंडचा कंबोडियावर हवाई हल्ला! 2 लष्करी तळ उद्ध्वस्त; 9 जणांचा मृत्यू
एरावन इमर्जन्सी मेडिकल सेंटरच्या माहितीनुसार, बाजारात चार सुरक्षा रक्षक आणि एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना अचानक झाल्यामुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली. स्थानिक नागरिकांना घरात राहण्याचा, दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तथापी, परिसर साफ होईपर्यंत कोणालाही प्रवेश न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.