Bangkok Earthquake Viral Video
Edited Image, X
Bangkok Earthquake Viral Video: शुक्रवारी थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला, ज्यामुळे इमारती हादरल्या. सुरुवातीच्या अहवालांनुसार, यूएस जिओलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या जीएफझेड जिओसायन्स सेंटरने सांगितले की दुपारचा भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला आणि त्याचे केंद्र शेजारच्या म्यानमारमध्ये होते. या भूकंपामुळे बँकॉकमध्ये एक बांधकाम सुरू असलेली इमारतही कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रेटर बँकॉक परिसरात 1.7 कोटींहून अधिक लोक राहतात.
बँकॉकमध्ये भूकंपामुळे इमारत कोसळली -
दुपारी झालेल्या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तात्काळ कोणतेही वृत्त मिळालेले नाही. भूकंप इतका शक्तिशाली होता की, यात अनेक उंच इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच वेळी, X वर एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये एक बांधकाम सुरू असलेली इमारत पत्यासारखी कोसळताना दिसत आहे.
हेही वाचा - Myanmar Earthquake: म्यानमार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले! 7 रिश्टर स्केलहून अधिक होती तीव्रता
बँकॉकमधील इमारत कोसळतानाचे व्हिडिओ व्हायरल -
दरम्या, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या कोसळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बँकॉकमधील कोसळलेल्या इमारतीची ओळख पटली असल्याचा दावा एका ट्विटमध्ये करण्यात आला आहे. एका एक्स वापरकर्त्याने म्हटले आहे की, भूकंपामुळे थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये कोसळलेली इमारत प्रत्यक्षात देशाच्या महालेखा परीक्षक कार्यालयाची (OAG) बांधकामाधीन इमारत होती. याशिवाय, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहण्यात आले ज्यावरून बँकॉकमधील विध्वंसाची कल्पना येऊ शकते.
हेही वाचा - PM Modi to Visit Thailand and Sri Lanka: पंतप्रधान मोदी थायलंड आणि श्रीलंकेला भेट देणार; बँकॉकमध्ये BIMSTEC परिषदेत सहभागी होणार
म्यानमारमध्ये होते भूकंपाचे केंद्र -
बँकॉकमधील भूकंपाशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया X वर व्हायरल होत आहेत. लोकांनी सांगितले की, भूकंपादरम्यान सुमारे एक मिनिट जमीन हादरत राहिली, ज्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वृत्तानुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू मध्य म्यानमारमध्ये होते, जे मोनीवा शहरापासून सुमारे 50 किलोमीटर पूर्वेस होते.