Alaska Plane Crash: अमेरिकेतील अलास्काहून एक विमान नोम शहराकडे जात होते. परंतु, हे विचान अचानक बेपत्ता झाले होते. त्यानंतर या विमानाला शोधण्यासाठी यंत्रणा तैनात करण्यात आली. आता विमानाचे अवशेष अलास्कातील समुद्रातील बर्फावर सापडले आहेत. बेपत्ता विमान समुद्रातील बर्फावर कोसळले. या दुर्घटनेत विमानात बसलेल्या सर्व 10 प्रवाशांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - पंतप्रधान मोदी 12-13 फेब्रुवारीला अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार; डोनाल्ड ट्रम्प यांची घेणार भेट
अमेरिकेतील अलास्कामध्ये कोसळले बेपत्ता विमान -
अलास्का सार्वजनिक सुरक्षा विभागाच्या म्हणण्यानुसार, बेरिंग एअर सिंगल-इंजिन टर्बोप्रॉप विमानाने उनालकलीट येथून नऊ प्रवासी आणि एक पायलटसह उड्डाण केले. अलास्काच्या पश्चिमेकडील प्रमुख शहर नोमजवळ विमानाचा संपर्क तुटला. कोस्ट गार्डने सांगितले की ते नोमच्या आग्नेयेस 30 मैल अंतरावर विमान बेपत्ता झाले. यानंतर, बचाव कार्य सुरू करण्यात आले आणि काही तासांनंतर त्यांना विमानाचे अवशेष सापडले.
विमानाने खराब हवामानात केले होते उड्डाण -
प्राप्त माहितीनुसार, या विमानाने जेव्हा उड्डाण केले तेव्हा हलका बर्फवृष्टी आणि धुके होते. उड्डाणानंतर अधिकाऱ्यांचा विमानाशी संपर्क तुटला. व्हाईट माउंटन अग्निशमन दलाचे प्रमुख जॅक अॅडम्स म्हणाले की, नोम आणि टोपकोक किनाऱ्याच्या दरम्यान कुठेतरी विमान रडारवरून गायब झाले. कोस्ट गार्डचे लेफ्टनंट कमांडर बेंजामिन मॅकइंटायर-कोबल यांनी सांगितले की, त्यांना विमानाकडून कोणतेही संकटाचे संकेत मिळाले नाहीत. विमानात आपत्कालीन स्थान शोधणारा ट्रान्समीटर असतो. जेव्हा ते समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात येते तेव्हा तटरक्षक दलाला संदेश पाठवला जातो की, विमान संकटात आहे. मात्र, पायलटने तटरक्षक दलाला असा कोणताही संदेश पाठवला नाही.
हेही वाचा - अमेरिकेत अटकेत असताना खायला दिलं जात होतं गोमांस;मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या लोकांनी सांगितली आपबीती
दरम्यान, अमेरिकन सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थनुसार, अमेरिकेतील इतर राज्यांच्या तुलनेत अलास्कामध्ये लहान विमानांचे अपघात जास्त होतात. अलास्कामध्ये डोंगराळ प्रदेश जास्त आहे. अलास्कामध्ये वस्तू आणि लोकांची वाहतूक करण्यासाठी लहान विमानांचा वापर केला जातो.