Wednesday, August 20, 2025 09:21:58 AM

नवीन टॅरिफ मागे घ्या...! एलोन मस्क यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन

एलोन मस्क यांनी स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नवीन टॅरिफ धोरण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

नवीन टॅरिफ मागे घ्या एलोन मस्क यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना आवाहन
Elon Musk With Donald Trump
Edited Image, X

Elon Musk On New Tariffs: सध्या जगभरात अमेरिकेने लावलेल्या नवीन टॅरिफचा परिणाम दिसून येत आहे. अशातच आता एलोन मस्क यांनी स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नवीन टॅरिफ धोरण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेने चीनला सांगितले आहे की, जर त्यांनी प्रत्युत्तर शुल्क मागे घेतले नाही तर अमेरिका त्यांच्यावर 50 टक्के अतिरिक्त शुल्क लादेल. अमेरिकेच्या या घोषणेनंतर जगभरात व्यापार युद्धाची शक्यता पुन्हा एकदा वाढली आहे. अमेरिकेच्या या ताज्या घोषणेविरुद्ध एलोन मस्क यांनी आवाज उठवला. 

वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, मस्क यांनी नवीन टॅरिफ धोरण मागे घेण्यासाठी थेट राष्ट्रपतींना आवाहन केले आहे. तथापि, या प्रयत्नात त्याला कोणतेही यश मिळाले नाही. कर प्रणालीवरून एलोन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2020 मध्ये जेव्हा मस्कने ट्रम्प प्रशासनाविरुद्ध शुल्काला आव्हान देण्यासाठी खटला दाखल केला तेव्हा दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचा - जगातील सर्वात शक्तिशाली देशाला 'या' आजाराचा विळखा; अनेकांचा मृत्यू

मस्क ट्रम्पच्या नवीन धोरणाच्या समर्थनात - 

दरम्यान, एलोन मस्क यांनी सुरुवातीला ट्रम्पच्या नवीन टॅरिफ धोरणाचे समर्थन केले. पण नंतर जेव्हा मस्कला त्याचे दुष्परिणाम दिसू लागले तेव्हा ते त्याविरोधात गेले. मस्कचे निकटवर्तीय असलेल्या ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे मस्कच्या व्यावसायिक भागीदारांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक लोकांनी उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांना त्यांचा संदेश राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, जगातील काही आघाडीच्या व्यावसायिक नेत्यांचा एक गट एक अनौपचारिक युती तयार करण्याचा प्रयत्न करत आहे जो ट्रम्प प्रशासनाला उदारमतवादी व्यापार धोरणांकडे ढकलण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा - इराण-अमेरिका तणाव शिगेला! ट्रम्प यांची इराणला बॉम्ब हल्ल्याची धमकी

ट्रम्पच्या धोरणांचा टेस्लावरही वाईट परिणाम - 

तथापी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या नवीन टॅरिफ धोरणाचा जगभरात नकारात्मक परिणाम होत आहे. जगभरातील शेअर बाजारात अराजकता आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम अमेरिकन शेअर बाजारावर दिसून आला आहे. विशेषतः ट्रम्पच्या या निर्णयामुळे एलोन मस्कच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
 


सम्बन्धित सामग्री