Wednesday, August 20, 2025 10:36:17 AM

शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ; मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यात आरोप निश्चित

शेख हसीना यांच्याविरुद्ध ढाका न्यायालयात मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसह 5 प्रकरणांमध्ये औपचारिक आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यात आरोप निश्चित
Sheikh Hasina
Edited Image

ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. आता माजी पंतप्रधान हसीनांना आणखी एका प्रकरणात खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले आहेत. शेख हसीना यांच्याविरुद्ध ढाका न्यायालयात मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसह 5 प्रकरणांमध्ये औपचारिक आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या हिंसाचारात सुमारे 1400 नागरिकांच्या मृत्यूसाठी शेख हसीना यांना जबाबदार धरण्यात आले आहे. या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतेक विद्यार्थी होते.

हेही वाचा - शेख हसीना यांना मोठा धक्का! न्यायालयाने सुनावली 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

दरम्यान, न्यायाधिकरणाने शेख हसीना, माजी गृहमंत्री असदुज्ज्झमन खान आणि माजी पोलिस महानिरीक्षक अब्दुल्ला अल मामून यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील निदर्शने दडपल्याबद्दल तिघांवरही मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचा आरोप ठेवण्यात आला आहे. तथापि, शेख हसीना आणि असदुज्ज्झमन खान सुनावणीसाठी उपलब्ध नाहीत. त्याच वेळी, अब्दुल्ला अल मामून तुरुंगात आहेत. बांगलादेशातील सरकार पडल्यानंतर शेख हसीनांनी भारतात आश्रय घेतला आहे. 

हेही वाचा - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांच्या अडचणी वाढल्या; अटक वॉरंट जारी

शेख हसीनांच्या पक्षावर बंदी - 

बांगलादेशचे सरकार चालवणारे मोहम्मद युनूस यांनी मे महिन्यात शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगवर दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत बंदी घातली होती. युनूस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अवामी लीग आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण (ICT) मध्ये सुरू असलेली सुनावणी पूर्ण होईपर्यंत ही बंदी लागू राहील, जेणेकरून देशाची सुरक्षा आणि सार्वभौमत्व जपता येईल. 
 


सम्बन्धित सामग्री