Air Ambulance Crashes in Kenya
Edited Image
Plane Crash in Kenya: केनियामध्ये एक भीषण विमान अपघात घडला असून, या दुर्घटनेत किमान 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी घडलेल्या या अपघातात एअर अॅम्ब्युलन्स केनियाच्या एका शाळेच्या इमारतीवर कोसळली. प्राथमिक माहितीनुसार, ही एअर अॅम्ब्युलन्स नायरोबी येथून एका वैद्यकीय आपत्कालीन मिशनसाठी झणझिबारकडे जात होती. मात्र उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याने ती थेट एका शाळेच्या इमारतीवर कोसळली.
या विमान अपघातात 2 डॉक्टर, 2 परिचारिका आणि 2 सामान्य लोकांचा मृत्यू झाला. केनिया नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने अपघाताची पुष्टी केली आणि सांगितले की, एअर अॅम्ब्युलन्स निवासी भागातील एका शाळेवर पडली. या अपघातात काही घरे उद्ध्वस्त झाले असून अनेकजण जखमी झाले आहेत. एअर अॅम्ब्युलन्स पडताच तिला आग लागली. ही एअर अॅम्ब्युलन्स शाळेच्या इमारतीवर कोसळली.
हेही वाचा - दुर्दैवी! बांगलादेशातील विमान अपघातात 16 विद्यार्थी, 2 शिक्षकांसह 19 जणांचा मृत्यू
टेकऑफ झाल्यानंतर 3 मिनिटांनी झाला अपघात -
आम्बू काउंटी कमिशनर हेन्री वाफुला यांनी अपघाताची माहिती देताना सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याच वेळी अर्धवट जळालेले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:14 वाजता हा अपघात झाला. एअर अॅम्ब्युलन्सने विल्सन विमानतळावरून सोमालियाच्या हार्गेसिया शहरात जाण्यासाठी उड्डाण केले. टेकऑफ झाल्यानंतर 3 मिनिटांनी एअर अॅम्ब्युलन्समध्ये तांत्रिक बिघाड झाला.
हेही वाचा - रशियामध्ये 50 प्रवाशांना घेऊन जाणारे अंगारा एअरलाइन्सचे विमान कोसळले
विमान पडताच त्याला आग लागली. अपघात पाहून घटनास्थळी लोकांची गर्दी जमली आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. लोकांनी विमान अपघाताची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती हाताळली. राष्ट्रीय पोलिस सेवा आणि केनिया संरक्षण दलाने संयुक्तपणे बचावकार्य हाती घेतले. हवाई अपघात तपास विभागाला अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.