Thursday, September 04, 2025 05:42:57 AM

History's Most Dangerous Punishments: जगाच्या इतिहासातील सार्वात त्रासदायक शिक्षांबद्दल तुम्हाला माहित आहे का?

इतिहासात असे अनेक हुकूमशाही शासक होते, ज्यांची शिक्षा देण्याची पद्धत अत्यंत क्रूर आणि त्रासदायक असायची. आज आपण इतिहासातील अशा काही क्रूर आणि धोकादायक शिक्षा देण्याच्या पद्धती सविस्तर जाणून घेणार आहोत.

historys most dangerous punishments जगाच्या इतिहासातील सार्वात त्रासदायक शिक्षांबद्दल तुम्हाला माहित आहे का

लहानपणी आई आपल्या मुलांना सांगायची, 'जर काही चुकीचे काम केले तर त्याची शिक्षा नक्कीच मिळणार.' यामुळे अनेकदा आपण चुका करताना शंभरवेळा विचार करतो. जर एखाद्या व्यक्तीने चूक केली, तर कायद्यानुसार त्या व्यक्तीला योग्य ती शिक्षा दिली जाते. आजच्या युगात जास्तीत जास्त फाशी किंवा आजन्म कारावासाची शिक्षा दिली जाते. मात्र, इतिहासात असे अनेक हुकूमशाही शासक होते, ज्यांची शिक्षा देण्याची पद्धत अत्यंत क्रूर आणि त्रासदायक असायची. तर आज आपण इतिहासातील अशा काही क्रूर आणि धोकादायक शिक्षा देण्याच्या पद्धती सविस्तर जाणून घेणार आहोत.

1. ड्रॉइंग अँड क्वार्टरिंग (Drawing and Quartering):

ही शिक्षा इंग्लंडमध्ये 13 व्या शतकात गंभीर गुन्ह्यांसाठी दिली जात होती. ही शिक्षा देताना दोषी व्यक्तीला सर्वप्रथम फासावर टांगले जात असे. मग त्या व्यक्तीला जिवंत स्थितीत कापले जाई. त्यानंतर, त्या व्यक्तीची आतडी बाहेर काढून त्याच्या शरीराला चार तुकड्यांमध्ये विभाजन केले जात असे. ही शिक्षा अत्यंत क्रूर आणि वेदनादायक होती.

हेही वाचा: Saurabh Murder Case: जेलमध्ये बिघडली तब्येत , डॉक्टरांनी केली चाचणी

2. द आयरन मेडेन (The Iron Maiden):

ही शिक्षा मध्ययुगीन काळात गंभीर गुन्हे करणाऱ्यांना दिली जात असे. या शिक्षेमध्ये दोषीला एका मोठ्या लोखंडी पेटीत उभे करून ठेवले जात असे. त्या पेटीच्या आतील भागात असंख्य तीक्ष्ण लोखंडी काटे असायचे. ती पेटी बंद करताच, त्यातील तीक्ष्ण लोखंडी काटे गुन्हा करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात घुसायचे आणि त्या व्यक्तीला अत्यंत वेदनादायक मृत्यूला सामोरे जावे लागायचे.

3. स्कॅफिझम (Scaphism):

ही शिक्षा प्राचीन पर्शियन काळातील क्रूर शिक्षांपैकी एक आहे. या शिक्षेमध्ये दोषी व्यक्तीला दोन हलक्या लाकडी नावामध्ये ठेवले जात असे आणि त्याच्या शरीरावर मध आणि दूध लावले जात असे. यामुळे किडे आणि जंतू त्या व्यक्तीच्या शरीरावर येत आणि हळूहळू त्या व्यक्तीला जिवंत खाण्यास सुरुवात करायचे. ही शिक्षा दोषी व्यक्तीला हळूहळू मृत्यूच्या दारी पाठवणारी होती.

4. ब्रेझन बुल (Brazen Bull):

प्राचीन ग्रीक काळात गुन्हेगारांना कठोर शिक्षा देण्यासाठी ही शिक्षा दिली जात होती. एका कथेनुसार, ज्या व्यक्तीने हे पितळी धातूचे बैल बनवले होते, त्याने तेव्हाच्या क्रूर राजाला भेट म्हणून दिले होते. आणि त्या व्यक्तीने या पितळी धातूच्या बैलाचे वैशिष्ट्य सांगू लागला. ज्यामध्ये त्याने अशी माहिती दिली की, 'यामध्ये एखाद्या व्यक्तीला या पितळी बैलाच्या पिंजर्‍यात ठेवल्यानंतर लगेच त्या बैलाखाली आग लावायची. ज्यामुळे आत असलेली व्यक्ती हळूहळू भाजली जात असे. जेव्हा ती व्यक्ती किंचाळायला लागेल, तेव्हा त्या बैलाच्या तोंडातून बाहेर येणारा आवाज एखाद्या मधुर संगीताप्रमाणे येईल.' मग त्या क्रूर राजाला प्रश्न पडला, 'नेमकं कुणाला आपण ही शिक्षा देऊ शकतो? ज्यामुळे आपल्याला कळेल की हे कसे काम करते?' मग त्या राजाने त्याच व्यक्तीवर याचे प्रयोग करण्याचे ठरवले, ज्याने पितळी धातूचे बैल बनवले. अशाप्रमाणे, सर्वप्रथम ही शिक्षा त्या व्यक्तीला मिळाली.

5. द रॅक (The Rack):

ही मध्ययुगीन काळातील शिक्षा होती, जिथे दोषी व्यक्तीला एका लाकडी फळकुटावर झोपवले जायचे. त्यानंतर त्याच्या हातापायांना दोरखंडाने बांधायचे. त्यानंतर हे दोर हळूहळू खेचले जात होते, ज्यामुळे शेवटी त्या व्यक्तीचे सांधे वेगळे होत जात होते आणि त्यानंतर त्याचे हाडेदेखील तुटून जात होते. ही शिक्षा एवढी त्रासदायक होती की, त्या व्यक्तीला अत्यंत कष्टदायक मृत्यूला सामोरे जावे लागायचे.


सम्बन्धित सामग्री