Wednesday, August 20, 2025 08:41:30 PM

Dubai Gold Price : दुबईत सोने स्वस्त का? भारतात किती सोने आणता येईल, जाणून घ्या नियम!

दुबईत सोनं स्वस्त का तसंच एका वेळेस दुबईतून किती सोनं आणता येतं. काय आहेत नियम..

dubai gold price  दुबईत सोने स्वस्त का भारतात किती सोने आणता येईल जाणून घ्या नियम
Dubai Gold Price : दुबईत सोने स्वस्त का? भारतात किती सोने आणता येईल, जाणून घ्या नियम!

बंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला १४.८ किलो सोने तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. रान्याच्या कपड्यांमध्ये लपवलेले १२.५६ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आलं आहेत. या घटनेमुळं दुबईहून मोठ्या प्रमाणावर भारतात येणाऱ्या सोन्याची तस्करी आणि दुबईमधील स्वस्त सोनं यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दुबईत सोनं स्वस्त का तसंच एकावेळेस दुबईतून किती सोनं आणता येतं. याचा आढावा आपण या लेखाच्या माध्यमातून घेऊयात...   

दुबईमध्ये सोनं स्वस्त का?
दुबईमध्ये भारताच्या तुलनेत सोने स्वस्त मिळण्याचे अनेक कारणे आहेत. दुबईचं मार्केट जगातील सर्वात मोठ्या गोल्ड मार्केटपैकी एक आहे. तसेच दुबईमध्ये गोल्ड ज्वेलरीवर कोणताही जीएसटी (GST) लागत नाही. तर भारतात ३ टक्के जीएसटी आहे. भारतात सोन्यावर १५ टक्क्यांपर्यंत आयात कर (Import Duty) असतो. तर दुबईत तो तुलनेने अत्यल्प आहे. दुबईतील ज्वेलरी स्टोअर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांची उत्पादन किंमत भारताच्या तुलनेत कमी असते. यामुळे दुबईमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत भारतापेक्षा ५ टक्के ते ७ टक्क्यांनी कमी असते. यामुळं अनेक लोक दुबईहून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करून भारतात आणतात.  

हेही वाचा -  वयाच्या 27 व्या वर्षी कमावली एलोन मस्क इतकी संपत्ती; कोण आहे 'ही' अद्भुत व्यक्ती? जाणून घ्या

दुबईहून भारतात किती सोनं आणता येतं?
भारतीय कस्टम कायद्यांनुसार, प्रवाशांना दुबईहून ठरावीक मर्यादेत सोनं आणण्याची मुभा आहे. यात पुरुष प्रवासी कस्टम ड्युटीशिवाय २० ग्रॅम (५०,००० रूपयापर्यंतचे) सोने भारतात आणू शकतात. तर महिला प्रवासींना यात जास्त मुबा आहे. महिला कस्टम ड्युटीशिवाय ४० ग्रॅम (१,००,००० रूपयापर्यंतचे) सोने घेऊन येऊ शकतात. तसेच ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ परदेशात राहून परतणाऱ्या भारतीयांना कस्टम ड्युटी भरून १ किलोपर्यंत सोने आणण्याची परवानगी आहे. 

हेही वाचा - दारुड्या माकडांबद्दल तुम्ही कधी ऐकलंय का? त्यांचं 'सोशल ड्रिंकिंग'ही असतं आणि जास्त ढोसली तर त्यांनाही होतो 'हँगओव्हर'!

याशिवाय १५ वर्षांखालील मुले ४० ग्रॅमपर्यंतचे गोल्ड दागिने ड्युटी फ्री आणू शकतात. पण त्यांच्या पालकांकडून योग्य कागदपत्रे आवश्यक असतात. जर प्रवासी या मर्यादेपेक्षा जास्त सोनं आणत असेल तर त्यांना ३ टक्के ते १० टक्क्यांपर्यंत कस्टम ड्युटी भरावी लागते. तसंच कस्टम अधिकाऱ्यांना खरेदीचे अधिकृत बिल दाखवावे लागते. 
 


सम्बन्धित सामग्री