Monday, September 01, 2025 08:03:10 AM

Rape Case: जोगेश्वरीत 12 वर्षीय मुलीवर बलात्कार

मुंबईतील जोगेश्वरी भागात धक्कादायक घटना घडली आहे.

rape case जोगेश्वरीत 12 वर्षीय मुलीवर बलात्कार

मुंबई: मुंबईतील जोगेश्वरी भागात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील बलात्कार प्रकरण ताजे असतानाच जोगेश्वरीत 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. 


राज्यात दिवसेंदिवस मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. यातच आता जोगेश्वरीत चिमुकली घरात एकटी असताना आरोपींनी तिला घरातून उचलून नेले. चिमुकलीला उचलून नेऊन आरोपींनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात 5 नराधम आरोपींना जोगेश्वरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जमाल, आफ्ताब, महफुज, हसन, जाफर अशी नराधम आरोपींची नावं आहेत. 

हेही वाचा : भयानक! आधी लोखंडी रॉड गरम केला मग त्याच रॉडने एकाला चटके देत मारले
मुंबईच्या जोगेश्वरी भागात 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी एकटी असताना तिला पळवून घेऊन गेल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. चिमुकलीला घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला आहे. एक नव्हे तर पाच नराधमांनी चिमुकलीवर अत्याचार केला आहे. यावेळी त्या चिमुकल्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचारही करवत नाही. चिमुकलीवर अत्याचार करण्याच्या गुन्ह्यात 5 नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. नराधमांनी चिमुकलीवर सामूहिक अत्याचार केले. या प्रकरणात जमाल, आफ्ताब, महफुज, हसन, जाफर असे पाच नराधम पोलिसांच्या ताब्यात आहेत. 


महाराष्ट्रात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या प्रकरणांमुळे तरूणींच्या मनावर परिणाम होत आहेत. नुकताच पुण्यातील स्वारगेटमध्ये पहाटे शिवशाही बसमध्ये एका तरूणीवर अत्याचार करण्यात आले. या अत्याचारामुळे संपूर्ण पुणे हादरले. तरूणीच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी कसून चौकशी करण्यास सुरूवात केली. दोन दिवसांत पुणे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आता या प्रकरणातील आरोपीवर कारवाई होत आहे. 

           

सम्बन्धित सामग्री