Wednesday, August 20, 2025 10:38:35 AM

धाराशिव जिल्ह्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर हल्ला

आंदरूड गावाची ग्रामदेवी जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्ताने कुस्तीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र अचानक गुंड निलेश घायवळ आल्यावर एक पैलवान त्याच्या दिशेने आला आणि त्याच्यावर हल्ला केला.

धाराशिव जिल्ह्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर हल्ला

धाराशिव: पुणे शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. धाराशिव येथील भूम तालुक्यातील आंदरूड गावात झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये हा प्रकार पाहायला मिळाला. आंदरूड गावाची ग्रामदेवी जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्ताने कुस्तीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कुख्यात गुंड म्हणून ओळखला जाणारा निलेश घायवळ कुस्ती पाहण्यासाठी आला होता. यादरम्यान, कुस्तीच्या फडात जाऊन तिथे असलेल्या पैलवानांची निलेशने भेट देखील घेतली होती. मात्र त्यावेळी अचानकपणे एक पैलवान कुख्यात गुंड निलेश घायवळच्या दिशेने आला आणि त्याच्या अंगावर धावून गेला. यादरम्यान, त्या पैलवानाने त्याला मारहाण करत जोरदार कानाखालीदेखील लगावली. ही घटना घडल्यानंतर, क्षणाचाही विलंब न करता त्वरित गुंड निलेश घायवळच्या मदतीला धावून आले. मात्र, या घटनेनंतर तो पैलवान तिथून फरार झाला. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत. फरार पैलवानाचे नाव आणि त्याने निलेश घायवळला का मारलं हे कारण अद्यापही उघडकीस आलेले नाही.

जेव्हा तो पैलवान निलेश घायवळच्या अंगावर धावला होता तेव्हा निलेश आणि तेथील आयोजक हे कुस्तीच्या आखाड्यात पैलवानांसोबत गाठीभेटी करण्यात मग्न होते. त्या कुस्ती आखाड्यात प्रसिद्ध मल्ल थापा याची कुस्ती सुरु होती. त्यामुळे कुस्ती प्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याच गर्दीचा गैरफायदा घेऊन त्या पैलवानाने अचानक गुंड निलेश घायवळवर हल्ला केला आणि त्याच्या कानशिलात लगावली.

आखाड्यात प्रसिद्ध मल्ल थापा याची कुस्ती सुरू होती. त्यामुळे कुस्ती शौकिनांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. घायवळही तिथे आपल्या समर्थकांसह उपस्थित होता. यात्रा कमिटीमधील कुस्ती फडाचे आयोजक पैलवानांची भेट घेत होते. त्यादरम्यान हलगीवाले आपली कला सादर करून दाखवत होते आणि त्यांच्यामागून घायवळ येत होता. तेव्हा गर्दीमधून आखाड्यात एक पैलवान उतरला आणि त्याने जाऊन थेट घायवळच्या कानाखाली लगावली. गुंड निलेश घायवळवर हल्ला झाल्यानंतर त्याच्या गुंडांनी लगेच त्या पैलवानाला मारहाण करायला सुरूवात केली आणि त्याच्यावर तुटून पडले. त्यांनी त्या पैलवानाला चांगलाच चोप दिला. कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या राड्याने मोठी खळबळ उडाली. पैलवान कोण आणि त्याने घायवळला कानाखाली का मारली असावी? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. भरमैदानात हा प्रकार घडल्यामुळे मैदानात खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


सम्बन्धित सामग्री