Wednesday, August 20, 2025 11:48:33 AM

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; दोन स्पा सेंटरवर पोलिसांची छापेमारी

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वैश्याव्यवसाय सुरु आहे. दोन स्पा सेंटरवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. या छापेमारीमुळे 18 मुलींची सुटका झाली आहे.

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय दोन स्पा सेंटरवर पोलिसांची छापेमारी

पुणे: पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वैश्याव्यवसाय सुरु आहे. दोन स्पा सेंटरवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. या छापेमारीमुळे 18 मुलींची सुटका झाली आहे. या 18 मुलींपैकी बहुतांश मुली थायलंडच्या नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. 

पुण्यातील विमानतळ आणि बाणेर या ठिकाणी सुरू असलेल्या दोन स्पा सेंटरवर पोलिसांनी छापेमारी केली. ही छापेमारी करून तब्बल 18 मुलींची सुटका केली आहे. यामध्ये विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या स्पा सेंटरमधून 16 मुली तर बाणेर पोलीस ठाण्याच्या आधी सुरू असलेल्या स्पा सेंटरमधून दोन अशा एकूण 18 मुलींची सुटका करण्यात आली. या अठरा मुलींपैकी बहुतांश मुली या थायलंड देशाच्या नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचप्रमाणे स्पा चालक, मॅनेजर आणि या प्रकरणाशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस उपयुक्त सोमय मुंडे यांनी दिली आहे.

हेही वाचा: लातूरमधील रस्ता एका रात्रीत गायब झाल्याने अधिवेशनात तीव्र पडसाद; महसूल मंत्र्यांनी दिले कारवाईचे संकेत

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली अवैध वैश्यव्यवसाय केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही पुणे विमानतळ आणि बाणेर परिसरात छापेमारी केली. या छापेमारीमध्ये आम्ही 18 मुलींची सुटका केली. सध्या या प्रकरणी कारवाई सुरु आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहारांचीही तपासणी केली जात असल्याचे पोलीस उपायुक्त सोमया मुंडे यांनी सांगितले आहे. 
 


सम्बन्धित सामग्री