पुणे: पुण्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून 25 वर्षीय एका विवाहितेने स्वत:चं आयुष्य संपंवलं. ही घटना पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकले. अशातच, आता या प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा: इथे माणूसकीनेही जीव सोडला ! हताश पतीने पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधला आणि...Video viral
नेमकं प्रकरण काय?
स्नेहा झगडे (वय: 25) यांनी टोकाची भूमिका घेत स्वत:चं आयुष्य संपंवलं. या घटनेनंतर, स्नेहाच्या वडिलांनी झडगे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, झडगे कुटुंबीयांच्या मागणीप्रमाणे मुलीचे लग्न लावून दिले. इतकच नाही, तर या लग्नासाठी मोठा खर्चही करण्यात आला होता. मात्र, तरीही आमच्या मुलीवर वारंवार अत्याचार केला. लग्नाच्या काही महिन्यानंतर, झडगे कुटुंबीय मोहोळला राहू लागले. त्यानंतर, ते पुण्यात राहायला आले. या दरम्यान, गावाकडे शेतजमीन खरेदी करण्यासाठी आम्ही झडगे कुटुंबीयांना पाच लाख रुपये दिले असल्याची माहिती स्नेहाच्या वडिलांनी केली.
पुढे तिचे वडिल म्हणाले की, 'जेव्हा आम्ही पुण्याला आलो तेव्हा झगडे कुटुंबीय कुठे राहतात याचा पत्ताही दिला नाही. वेळू येथे झडगे कुटुंबीयांची कंपनी आहे. जेव्हा, स्नेहाचा भाऊ त्यांच्या कंपनीत गेला होता, तेव्हा त्याला हाकलण्यात आले होते. त्यामुळे, आमची मुलगी सुरक्षित तर असेल ना? असा प्रश्न आम्हाला पडू लागला. लग्नाच्या सुरूवातीला स्नेहाला नीट जेवण सुद्धा बनवता येत नाही, असं म्हणत तिला त्रास दिला गेला. लग्न झाल्या्च्या सुरूवातीला नीट जेवणसुद्धा बनवता येत नाही, असं म्हणत तिला त्रास देत होता. त्यानंतर, काही दिवसांनी स्नेहाच्या सासरच्यांकडून कंपनी सुरू करण्यासाठी 20 लाख रुपयांची मागणी केली. याचवेळी, रक्षाबंधनाला भावाला बोलव आणि येताना पैसेही घेऊन ये असं सांगण्यात आले. नंतर स्नेहाच्या वडिलांनी सांगितले की, 'सासरच्या जाचाला कंटाळून स्नेहाने सासरच्यांविरोधात तक्रारही दाखल केली होती. मात्र, सासरच्यांच्या दबावामुळे स्नेहाने नाईलाजास्तव तक्रार मागे घेतली. त्यामुळे, अनेक दिवसांपासून स्नेहा मानसिक तणावाखाली होती. त्यामुळे, स्नेहाने स्वत:चं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी राहत्या घरी तिनं स्वत:चं जीवन संपवलं'. याप्रकरणी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात स्नेहाचा पती विशाल झडगे, सासरे संजय झडगे, सासु विठाबाई झडगे, दीर विनायक झडगे, नणंद तेजश्री थिटे, नंदेचा पती परमेश्वर थिटे आणि सासऱ्याचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.