Wednesday, August 20, 2025 01:09:51 PM

गॅस कटरने ATM मशीन कापली, भरवस्तीत चोरट्यांचा १६ लाख रूपयांवर डल्ला

शिरूर तालुक्याच्या शिक्रापूर येथील सणसवाडी परिसरात एसबीआय बँकेचे आहे. ते एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडले आणि त्यातील तब्बल १६ लाख रुपयांची रोकड लंपास केली.

गॅस कटरने atm मशीन कापली भरवस्तीत चोरट्यांचा १६ लाख रूपयांवर डल्ला
गॅस कटरने ATM मशीन कापली, भरवस्तीत चोरट्यांचा १६ लाख रूपयांवर डल्ला

चोरट्यांनी बँकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्या मशिनमधील तब्बल १६ लाख रूपयांची रोकड पळवल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यात हा प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

शिरूर तालुक्याच्या शिक्रापूर येथील सणसवाडी परिसरात एसबीआय बँकेचे आहे. ते एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडले आणि त्यातील तब्बल १६ लाख रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे, भरवस्तीत रात्रीच्या सुमारास चोरटयांनी हा दरोडा टाकलाय. सकाळी परिसरातील नागरिकांना एटीएम फोडल्याचा प्रकार निदर्शनात आला. तेव्हा त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.    

हेही वाचा - Crime News : ब्लॅकमेलिंगला कंटाळलेल्या महिलेनं असा काढला त्याचा 'काटा' 

शिरूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ पहायला मिळत असून घरफोडीसोबत चोरट्यांकडून एटीएम मशीन देखील लक्ष्य केले जात आहे. एटीएम हे गॅस कटरच्या सहाय्याने फोडलं जात आहेत. अनेक घटनामध्ये तर चोरटे थेट मशीनचं घेऊन पळाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. आता शिक्रापूर येथे रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएमवर डल्ला मारला आहे.  

शिक्रापूर येथे भरवस्तीमध्ये एसबीआय बँकेचे एटीएम आहे. रात्री उशिरा चोरट्यांनी या एटीएमवर दरोडा टाकला. एटीएममध्ये प्रवेश करून चोरट्यानी आतमध्ये एटीएम मशीनचा पत्रा गॅस कटरच्या सहाय्याने कापला. यानंतर एटीएममधील १६ लाख रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. गॅस कटरचा वापर केल्याने एटीएम मशीन जळालं आहे.   

हेही वाचा -  नांदेडमध्ये भरदिवसा गोळीबार; गुरुद्वाराबाहेर दुचाकीस्वार हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात 3 जण जखमी, एकाचा मृत्यू

सकाळी या दरोड्याचा प्रकार उघडकीस आला. परिसरातील नागरिकांना एटीएम मशीन कटरच्या साह्याने फोडल्याचं निदर्शनात आलं. तेव्हा नागरिकांनी या घटनेची माहिती शिक्रापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिस एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. या संदर्भातील गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला असून पोलिस सखोल तपास करत आहेत. 


सम्बन्धित सामग्री