दृश्यम २ च्या यशानंतर सुप्रसिद्ध दक्षिणात्त्य अभिनेते मोहनलाल यांनी गुरुवारी एक्स च्या माध्यमातून 'दृश्यम 3' या आगामी चित्रपटाची माहिती आपल्या प्रेक्षकांना दिले आहे. त्यासोबतच त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन जीतू जोसेफ करतील आणि चित्रपटाची निर्मिती अँटोनी पेरुम्बावूर करतील अशी माहिती मोहनलाल यांनी दिली. सध्या या चित्रपटावर काम सुरू असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
2013 साली हा क्राईम थ्रिलर चित्रपट मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला. हा चित्रपट एका अश्या मुलासोबत सुरु होते जो चौथीपर्यंतचे शिक्षण असतो आणि सध्या तो एका गावामध्ये केबल टीव्ही संबंधित कामे करणारा व्यावसायिक आहे. त्याचे लग्न राणी नावाच्या महिलेसोबत लग्न झाला असून त्यांना अंजु आणि संजू अश्या दोन मुली असतात. शालेय सहलीदरम्यान, पोलिस महानिरीक्षक गीता यांचा मुलगा वरुण त्याच्या लपवलेल्या मोबाईलच्या माध्यमातून अंजुचा फोटो काढतो आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरु करतो. त्याच दिवशी रात्री वरुण अंजुच्या राहत्या घरी येतो आणि तिला ब्लॅकमेल करतो. तेव्हा अंजु त्याच्या डोक्यावर मारते ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू होतो. त्यांनी मृत वरुणचे शरीर एका कंपोस्ट पिटमध्ये पुरतात, जे अनुने पहिले. आपल्या मुलीसोबत गैरवर्तन केलेल्या मुलाला तो कश्याप्रकारे लपवतो आणि शेवट्पर्यंत ही गोष्ट कश्याप्रकारे अंजुचा परिवार लपवतो हे या चित्रपटात दर्शवण्यात आले आहे.
मूळ मल्याळम भाषेत प्रदर्शित झालेल्या द्रिश्यम चित्रपटाची कथा, आणि उत्तम दिग्दर्शन आणि त्यासोबतच अनुभवी कलाकार यांच्या अभिनयामुळे हा चित्रपट यशस्वी झाला. या चित्रपटाच्या यशामुळे आणि त्यासोबतच कथेमुळे या चित्रपटाला कन्नड, तेलुगू, तामिळ आणि हिंदी सारख्या भाषांमध्ये प्रदर्शित झाले.