Thursday, August 21, 2025 04:01:36 AM

अक्षय केळकरची शिवरायांना अनोखी मानवंदना,कलेतून साकारले छत्रपती शिवराय!

अभिनेता अक्षय केळकरने आपल्या अफलातून चित्रकलेच्या कौशल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य चित्र रेखाटले आहे.

अक्षय केळकरची शिवरायांना अनोखी मानवंदनाकलेतून साकारले छत्रपती शिवराय

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रमी योद्धे, शककर्ते, कुशल प्रशासक आणि प्रजाहितदक्ष राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti 2025) संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक ठिकाणी शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी होत असून, मिरवणुका, ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना दिली जात आहे. अशातच मराठमोळ्या अभिनेता अक्षय केळकरने महाराजांना आपल्या कलेच्या माध्यमातून अनोखी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अभिनेता अक्षय केळकरने आपल्या अफलातून चित्रकलेच्या कौशल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य चित्र रेखाटले आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच तो पांढऱ्या कागदावर अत्यंत समर्पकपणे महाराजांचे स्केच करतो आणि नंतर आकर्षक रंगसंगतीच्या साहाय्याने त्या कलाकृतीला पूर्णत्वास नेतो. हा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर करत “जय भवानी, जय शिवाजी!” असे भावनिक कॅप्शन दिले आहे. मेहनत, समर्पण आणि कलात्मकतेच्या संगमातून साकारलेले हे चित्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा : शिवजयंतीच्या निमित्ताने विकी कौशल रायगडावर

अक्षयच्या या अप्रतिम चित्रकलाकृतीने चाहत्यांची मने जिंकली असून, त्याच्या या कौशल्याचे भरभरून कौतुक होत आहे. अनेकांनी कमेंट्स आणि शेअर्सद्वारे त्याच्या मेहनतीला दाद दिली आहे.

अक्षय केळकर – अभिनेता आणि उत्कृष्ट चित्रकार!

अक्षय केळकर हा केवळ एक दमदार अभिनेता नाही तर तो एक उत्कृष्ट चित्रकारही आहे. ‘बिग बॉस मराठी 4’च्या विजेतेपदाने त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्याने ‘अबीर गुलाल’ या मालिकेतही दमदार भूमिका साकारली होती. अभिनयाच्या जोडीला त्याच्या चित्रकलेनेही प्रेक्षकांना मोहून टाकले आहे. 

 

'>http://

 


सम्बन्धित सामग्री






Live TV