Wednesday, September 03, 2025 10:38:54 PM

Apoorva Mukhija Death Threat: इंडियाज गॉट लेटेंट वादानंतर अपूर्व मखीजाला जीवे मारण्याच्या धमक्या

गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडलेली अपूर्वा मखीजाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, तिने आपल्याला मिळालेल्या अनेक धमक्यांचे कमेंट्स आणि मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

apoorva mukhija death threat इंडियाज गॉट लेटेंट वादानंतर अपूर्व मखीजाला जीवे मारण्याच्या धमक्या
Apoorva Mukhija Death Threat
Edited Image

Apoorva Mukhija Death Threat: इंडियाज गॉट लेटेंटच्या एका भागामुळे गेल्या काही महिन्यांपासून वादात सापडलेली अपूर्वा मखीजाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, तिने आपल्याला मिळालेल्या अनेक धमक्यांचे कमेंट्स आणि मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. एवढेच नाही तर या वादानंतर, अभिनेत्रीला बलात्कार आणि हत्येची धमकीही देण्यात आली आहे.

अपूर्वा माखिजाला बलात्काराच्या धमक्या - 

दरम्यान, पोस्टच्या पहिल्या स्लाईडमध्ये अभिनेत्रीने लिहिले आहे की, 'ट्रिगर वॉर्निंग: या पोस्टमध्ये अ‍ॅसिड हल्ला, बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचे स्क्रीनशॉट आहेत.' इतर 19 स्लाईड्समध्ये वापरकर्त्यांनी वापरलेल्या अपमानास्पद भाषेचे आणि तिला दिलेल्या धमक्यांचे पुरावे आहेत. एकाने लिहिले, 'तुझ्या आईवडिलांनी तुला काही शिकवले नाही का?', दुसऱ्याने लिहिले, 'वाईट मुलगी', तर काहींनी लिहिले, 'तुला लाज नाही का?' 

हेही वाचा - CID निर्मात्यांनी केली ACP प्रद्युमन यांच्या मृत्यूची घोषणा, चाहत्यांमध्ये संतापाची लाट

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री असे लिहिले आहे की, 'मी जे शेअर केले आहे त्याच्या 1% देखील हे नाही.' यावरून हे स्पष्ट होते की बऱ्याचदा सोशल मीडिया हे असे व्यासपीठ बनते जिथे एखाद्या गोष्टीच्या तळाशी जाण्याऐवजी किंवा न्यायाची वाट पाहण्याऐवजी लोक थेट हल्ला करण्याची धमकी देऊ लागतात.' 

अपूर्वा माखीजाची पोस्ट - 

हेही वाचा - कुणाल कामराने ठोठावला मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा; FIR रद्द करण्याची केली मागणी

दरम्यान, या पोस्टनंतर काही मिनिटांनी, तिने आणखी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, 'स्टोरीटेलरचा आवाज हिरावून घेऊ नका.' अपूर्वाला 'द रिबेल किड' म्हणून प्रसिद्ध आहे. इंडियाज गॉट टॅलेंटच्या एका वादग्रस्त भागात रणवीर अलाहबादिया, समय रैना आणि आशिष चंचलानी यांच्यासोबत दिसल्यानंतर तिच्यावर  मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, अपूर्वाने इंस्टाग्रामवर सर्वांना अनफॉलो केले आणि 1 एप्रिल रोजी तिने तिच्या सर्व पोस्ट डिलीट केल्या. आता अपूर्वा मखीजाने इंस्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुनरागमन केले आहे.
 


सम्बन्धित सामग्री