Monday, September 01, 2025 11:25:45 AM

Athiya Shetty KL Rahul Blessed With Baby Girl: सुनील शेट्टी आजोबा झाला! अथिया शेट्टीने दिला गोंडस मुलीला जन्म

अथिया आणि केएल राहुल यांनी त्यांच्या मुलीच्या आगमनाची घोषणा केली असून ही गोड बातमी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

athiya shetty kl rahul blessed with baby girl सुनील शेट्टी आजोबा झाला अथिया शेट्टीने दिला गोंडस मुलीला जन्म
Athiya Shetty and KL Rahul
Edited Image

Athiya Shetty Blessed With Baby Girl: अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी पालकत्वाचा एक नवीन प्रवास सुरू केला आहे. अथिया आणि केएल राहुल यांनी त्यांच्या मुलीच्या आगमनाची घोषणा केली असून ही गोड बातमी सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. सोमवारी, या जोडप्याने इंस्टाग्रामवर एक संयुक्त पोस्ट शेअर करून ही बातमी जाहीर केली. ही बातमी शेअर करताना, या जोडप्याने दोन हंसांचे एक चित्र पोस्ट केला. यावर पोस्टमध्ये त्यांनी बाळाच्या आगमनाची बातमी दिली. 

हेही वाचा - 'मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो...'; सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात CBI च्या क्लोजर रिपोर्टवर रिया चक्रवर्तीच्या वकिलाची प्रतिक्रिया

सुनील शेट्टी बनला आजोबा - 

अथिया शेट्टीने मुलीला जन्म दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी आजोबा बनला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये 24-03-2025 असा उल्लेख आहे. अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया आणि केएल राहुल यांनी पोस्टमध्ये जास्त मजकूर न लिहिता, बाळाची इमोजीसह मुलीला जन्म दिल्याची बातमी शेअर केली आहे. 

हेही वाचा - 31 वर्षांनी लहान असलेल्या रश्मिकासोबतच्या रोमाँटिक सीन्सवरून सलमान खान ट्रोल; ट्रोलर्सला काय म्हणाला?

अथियाच्या गरोदरपणाची घोषणा - 

ही बातमी शेअर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आणि शुभचिंतकांनी अभिनंदनपर संदेशांनी कमेंट्स सेक्शन भरले आहे. चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांनी त्यांच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना गरोदर असल्याची गुड न्यूज दिली होती. त्यावेळी अथियाने केएल राहुलसह त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट शेअर करण्यासाठी एक संयुक्त नोट शेअर केली होती. 


सम्बन्धित सामग्री