मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकरने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना मोहित केलं आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या एका खास कार्यक्रमात अमृताने स्टायलिश अंदाजात हजेरी लावली. या कार्यक्रमात तिची भेट बॉलीवूडची दमदार अभिनेत्री शेफाली शहाशी झाली. त्यांच्या या भेटीमुळे चाहत्यांमध्ये चर्चेचा नवा विषय तयार झाला आहे.

अमृता खानविलकर तिच्या अभिनय कौशल्यासोबतच तिच्या नृत्यकलेसाठी ओळखली जाते. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लूकचे फोटो आणि रील्स शेअर करत राहते. त्यामुळे ती सतत चर्चेत राहते. मात्र, या कार्यक्रमात तिच्या हटके स्टायलिश लूकने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अमृताने या वेळी ब्राउन कलरचा आकर्षक वन पीस परिधान केला होता, जो तिच्या हटके गोल्डन अॅक्सेसरीजसोबत परिपूर्ण दिसत होता. तिच्या या लूकमुळे ती कार्यक्रमातील हायलाइट बनली होती.

या कार्यक्रमात अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. अमृताने तिच्या चाहत्यांसाठी काही खास क्षण शेअर केले, ज्यात तिची शेफाली शहासोबतची भेट एक महत्त्वाचा भाग ठरली.