मुंबई: बॉलीवूडमध्ये अनेक नवीन चेहरे येतात. यातील काहीजण नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून अचानक गायब होतात. काही अभिनेत्री त्यांच्या सौंदर्याने आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात, तर काही अभिनेत्रींची झेरॉक्स कॉपी म्हणून लक्षात राहतात. आज आपण एक अशा अभिनेत्रीबाबत बोलणार आहोत, जिला एकेकाळी माधुरी दीक्षितची झेरॉक्स कॉपी म्हटले जात असे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून फरहीन खान आहे. या अभिनेत्रीबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे की एकेकाळी मोठ्या पडद्यावर राज्य करणारी फरहीन खान ही अभिनेत्री कुठे गायब झाली? आणि ती सध्या काय करत आहे? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: 19 वर्षांची प्रतिक्षा संपली; मीनाताई ठाकरे नाट्यगृहाचे शिंदेंच्या हस्ते लोकार्पण
पहिल्याच चित्रपटातून फरहीनला ओळख मिळाली
1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जान तेरे नाम' या चित्रपटातून फरहीनने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाने तिला एका रात्रीत प्रसिद्धी दिली. या चित्रपटात अभिनेता रोनित रॉय मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील गाणी खूपच लोकप्रिय झाले होते, विशेषतः 'पहली बार देखा तुम्हें' हे गाणे अजूनही प्रसिद्ध आहे. मात्र, या चित्रपटाच्या यशानंतर तिला माधुरी दीक्षितची झेरॉक्स कॉपी म्हणून ओळखले जाऊ लागले, ज्यामुळे तिची ओळख मर्यादित झाली.
हेही वाचा: 'संस्थेद्वारे होणाऱ्या गैरकारभाराची शासनाने चौकशी करावी' - माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील
काही चित्रपटांनंतर फरहीन अचानक गायब झाली
फरहीनने 'सैनिक' चित्रपटात अक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका साकारली होती, ज्याचे प्रेक्षकांनी कौतुक केले. या अभिनेत्रीने 'अमानत', 'आग का तूफान' आणि 'दिल की बाजी' सारख्या चित्रपटांमध्येही काम केले. बॉलीवूडसह फरहीनने दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही चांगले नाव कमावले. 1993 मध्ये तिने कमल हासनसोबत 'कालागनन' हा तमिळ चित्रपट केला, जो त्यावेळी सुपरहिट ठरला होता. विशेष बाब म्हणजे त्याच वर्षी फरहीनला 'बाजीगर' चित्रपटात शाहरुख खानसोबत सीमाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र, फरहीनने ही संधी सोडली आणि दक्षिणेकडील चित्रपटाला प्राधान्य दिले. त्यामुळे, ही भूमिका शिल्पा शेट्टीला देण्यात आली. या भूमिकेमुळे शिल्पा शेट्टीला चित्रपटसृष्टीत स्थान मिळाले.
हेही वाचा: पुणेकरांसाठी खुशखबर! वाहतूक कोंडी सुटणार; 'या' ठिकाणी होणार मेगा टर्मिनल
'या' क्रिकेटपटूच्या प्रेमात पडली फरहीन
कारकिर्दीच्या शिखरावर असताना फरहीनने अचानक बॉलिवूडला निरोप दिला. कारण तेव्हा फरहीन प्रेमात पडली. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून भारतीय क्रिकेटपटू मनोज प्रभाकर होती. काही दिवसानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर फरहीनने बॉलीवूडला रामराम केले. गेल्या अनेक वर्षांपासून ती एका स्थिर आणि आनंदी कुटुंबाचे स्वप्न पाहत होती, कारण तिचे स्वतःचे बालपण एका तुटलेल्या कुटुंबात गेले होते. या लग्नातून तिला हा आनंद मिळाला.
फरहीन सध्या कुठे आहे?
लग्नानंतर, फरहीन दिल्लीला स्थलांतरित झाली आणि तिने स्वतःला चित्रपटांपासून पूर्णपणे लांब केले. सध्या फरहीनला राहिल आणि मनवंश ही दोन मुले आहेत. यासह, फरहीन आता एक यशस्वी व्यावसायिक महिला आहे. ती सेंद्रिय स्किनकेअर उत्पादनांची कंपनी चालवते आणि नैनितालमध्ये एका सुंदर होमस्टेची मालकीण आहे.