Thursday, August 21, 2025 02:54:27 AM

Cannes 2025: मराठमोळ्या नेहा पेंडसेचे कान्स पदार्पण; लूक पाहून चाहते घायाळ

मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्ट्रीत आपला ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे अनेक गोष्टीमुळे ती सतत चर्चेत येत असते. आता नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आणि त्याच कारण देखील तितकच खास आहे.

cannes 2025 मराठमोळ्या नेहा पेंडसेचे कान्स पदार्पण लूक पाहून चाहते घायाळ

मुंबई : मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्ट्रीत आपला ठसा उमटवणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे अनेक गोष्टीमुळे ती सतत चर्चेत येत असते. तिच्या कमालीच्या फॅशन आणि ग्लॅमरस फोटोंमुळे ती कायम चर्चेत असते आता नेहा पुन्हा एकदा चर्चेत आली आणि त्याच कारण देखील तितकच खास आहे. 

मराठीबरोबरच नेहाने हिंदी कलाविश्वदेखील गाजवलं आहे. मे आय कम इन मॅडम? या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. पुढे नेहा पेंडसे भाभीजी घर पर है मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती आणि नेहा पेंडसे शेवटची जून या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर नेहा काय नवीन भूमिका साकारणार कोणत्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार यासाठी चाहते देखील तितकेच उत्सुक होते पण आता प्रतीक्षा संपली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण नेहा सातासमुद्रापार असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डेब्यू करणार आहे. 

हेही वाचा :  सिंधुदुर्ग सुपुत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व; वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

नेहा कान्समध्ये डेब्यू करणार असून तिने फ्रेंच फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली  आहे. कान्समधील नेहाचा रेड कार्पेट लूक आता समोर आला असून तिच्या या खास आऊटफिटमध्ये ती सुंदर दिसत आहे.  नेहाचा हा पहिला कान्स लूक असून अजून दोन वेगवेगळ्या आणि तितक्याच आकर्षक लूक्समध्ये ती दिसणार आहे.

कान्सबद्दल बोलताना नेहा सांगते, "प्रत्येक कलाकारांसाठी कान्समध्ये जाणं हे एक स्वप्न असत आणि माझ्यासाठी सुद्धा हा क्षण स्वप्नपूर्तीसारखा आहे. मला माझा लूक हा थोडा खास ठेवायचा होता तसेच तो कसा उठावदार आणि वेगळा दिसू शकतो याचा देखील मी विचार केला आणि मनीष घरतने हे सत्यात उतरवण्यासाठी माझी मदत केली. त्याने हा लूक उत्तम बनवला आहे. कान्ससाठीचा लूक हा मला शार्प आणि तितकाच ताकदीचा असावा असं वाटतं होतं. कान्स डेब्यू करताना थोडी धाकधूक तर होती पण टेन्शन न घेता तिथल्या गोष्टी छान एन्जॉय करायचा हेच ठरवून मी इकडे आली आहे".

नेहाने आजवर तिच्या प्रत्येक फॅशन स्टेटमेंटने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि कान्समधल्या तिच्या या लूकच प्रेक्षकदेखील तितकच तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत.


सम्बन्धित सामग्री