मीम् म्हटल्यावर आपल्याला अनेक प्रकारचे हास्यविनोदी व्हिडिओस आठवतात. दर महिन्याला आपल्याला पोट धरून हसण्यास प्रवृत्त करणाऱ्या अनेक व्हिडिओस आपल्याला 2024 मध्ये पाहायला मिळाले. आहा टमाटर बडे मजेदार पासून ते जूस पिलादो मोसंबी का असे अनेक मीम्स 2024 मध्ये खूप गाजले. चला तर आपण जाणून घेऊया कोणते मीम्स 2024 मध्ये प्रसिद्ध झाले.
1 - बदो बदी:
पाकिस्तानमधील व्हायरल झालेला 'बदो बदी' व्हिडिओ भारतात मोठ्या प्रमाणात गाजला. या व्हिडिओमध्ये चाहत फतेह अली खान यांच्या विचित्र आणि अर्थहीन गाण्यामुळे आणि बोलमुळे (लिरिक्समुळे) हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. चाहत फतेह अली खान यांचे 'बदो बदी' गाणं ऐकल्यावर त्यांना ढिंच्याक पूजा यांचा भाऊ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
हेही वाचा: नेटफिक्सवरील 'हे' आहेत सस्पेन्स-थ्रिलरयुक्त चित्रपट
2 - आहा टमाटर बडा माजेदार:
2024 मध्ये गाजलेल्या आहा टमाटर बडा माजेदार या हिंदी भाषीय नर्सरी गाण्याने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला. या गाण्यातील गोडवा आणि मजेदार स्वभावामुळे प्रचंड लोकप्रिय झाला. या गाण्यातील सूर, ताल अनेकांना आकर्षित केले. बऱ्याचदा लहान मुलांसाठी बनवलेली गाणी मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात.
3 - छिन टपाक डम डम:
पोगो चॅनलमधील 'छोटा भीम' या लोकप्रिय मालिकेमधील हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये खलनायक टाकियाने त्याचा बदला पूर्ण करण्यासाठी 'छिन टपाक डम डम' असे वाक्य बोलतो. ज्यामुळे या व्हिडिओ रूपांतर मीम्समध्ये झाला. त्यामुळे या मीम्सने भारतात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सर्वसामान्य लोकांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी यावर मीम्सदेखील बनवले.
हेही वाचा: बिबट्यापुढे ताकद दाखवण्याचा प्रयत्न महागात! 5 सेकंदात हातच तोडला – थरारक व्हिडीओ व्हायरल
4 - एक मछली पानी में गई, छपाक:
मान तोमर नावाच्या एका मुलाने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता ही मुले गेम खेळण्यासाठी वर्तुळात बसतात. तेव्हा गेम खेळताना त्यामधील हा मुलगा "एक मछली पानी में गई, छप्पक," हे वाक्य बोलतो. या व्हिडिओला अनेक जणांनी लाईक्स, कंमेंट्स आणि शेअर केले आणि या व्हिडिओला अनेक प्रसिद्ध लोकांनी यावर रीमेकदेखील केले.