अलीकडेच प्रदर्शित झालेल्या पुष्पा २, आरआरआर, कांतारा आणि केजीएफ सारख्या दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉक्स ऑफिसमध्ये कोट्यवधींची कमाई केली. त्यामुळे आपल्या चित्रपटालादेखील घवघवीत यश मिळावे यासाठी अनेक बॉलीवूड कलाकार दाक्षिणात्य कलाकारांना घेऊन चित्रपट बनवतात. ज्याप्रमाणे दाक्षिणात्य चित्रपटात काम करणारे अभिनेते प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे दाक्षिणात्य चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्र्यादेखील खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी साकारलेल्या उत्तम अभिनयामुळे त्या दक्षिण भारतासोबतच संपूर्ण देशभरात लोकप्रिय झाल्या. दक्षिण भारतात अश्या अनेक अभिनेत्र्या आहेत ज्या एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपयांचे मानधन घेतात. त्यासोबतच त्यांची लोकप्रियता फक्त दक्षिण भारतापुरतेच मर्यादित नसून संपूर्ण भारतात आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहेत त्या दाक्षिणात्य अभिनेत्र्या ज्या कोट्यवधी रुपयांचे मानधन घेतात.
1 - नयनतारा:
दक्षिण भारतातील 'लेडी सुपरस्टार' म्हणून ओळखली जाणारी नयनताराची एकूण संपत्ती 200 कोटी रुपये आहे. नयनतारा दाक्षिणात्य सिनेमातील एक प्रसिद्ध नाव असून ती एका चित्रपटासाठी 3 ते 12 कोटी रुपये मानधन घेते.
2 - अनुष्का शेट्टी:
“बाहुबली” सारख्या ब्लॉकबस्टर सिनेमात 'देवसेना' ची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टीची एकूण संपत्ती 130 कोटी रुपये आहे. अनुष्का शेट्टी एका चित्रपटासाठी 5 ते 7 कोटी रुपये मानधन घेते. अनुष्का शेट्टीची वार्षिक कमाई सुमारे 12 कोटी रुपये आहे.
3 - तमन्ना भाटिया:
तमन्ना भाटिया तिच्या स्टायलिश लुक आणि डान्स नंबरसाठी ओळखली जाते. तिची एकूण संपत्ती 120 कोटी रुपये आहे आणि ती एका चित्रपटासाठी 1.5 ते 5 कोटी रुपये मानधन घेते.
हेही वाचा: तमन्ना भाटिया-विजय वर्माचं ब्रेकअप? इन्स्टावरिल फोटो केले डिलिट
4 - सामंथा रुथ प्रभू:
समंथा रुथ प्रभूची एकूण संपत्ती 100 कोटी रुपये असून ती प्रत्येक चित्रपटासाठी 3 ते 8 कोटी रुपये मानधन घेते. सामंथा रुथ प्रभूचा ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘सिटाडेल हनी बनी’ चित्रपटामुळे दक्षिण सोबतच तिने उत्तर भारतातदेखील स्वतःचे स्थान निर्माण केले.
5 - त्रिशा कृष्णन:
त्रिशा कृष्णन ही दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची एकूण संपत्ती 85 कोटी रुपये आहे आणि ती एका चित्रपटासाठी 2 ते 7 कोटी रुपये मानधन घेते.
6 - रश्मिका मंदान्ना:
नुकतीच 'ॲनिमल', 'छावा' यासारख्या मोठ्या बजेटच्या हिंदी चित्रपटातून उत्तर भारतात लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री रश्मिका मंदान्ना एका चित्रपटासाठी 4 ते 8 कोटी रुपये कमावते. रश्मिका मंदान्नाची एकूण संपत्ती 66 कोटी रुपये आहे.
हेही वाचा: Kantara Film: कांतारा चित्रपटांत दाखवलेल्या पंजुर्ली देवता कोण आहेत?
7 - साई पल्लवी:
फिदा, मारी 2, यांसारख्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटात साई पल्लवीने आपल्या अभिनय कौशल्याने संपूर्ण भारतात एक वेगळेच स्थान निर्माण केले. सूत्रांनुसार साई पल्लवीची एकूण संपत्ती 47 कोटी रुपये असून ती ती एका चित्रपटासाठी 3 ते 15 कोटी रुपये मानधन घेते.