चित्रपट म्हटल्यावर आपल्यासमोर येणारे दृश्य म्हणजे हिरो आणि व्हिलन यांची मारामारी किंवा एखादे कट - कारस्थान आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र अलीकडच्या काळात भारतामध्ये अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आणि विज्ञानावर आधारित चित्रपट पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे प्रेक्षकवर्ग या चित्रपटांना पाहण्यासाठी चित्रपटगृहांत गर्दी करताना दिसत आहेत. तर जाणून घेऊया कोणते आहेत ते भारतीय सिनेमे ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
हेही वाचा: Girlfriend ने Delete केलेला WhatsApp मेसेज कसा Recover कराय? जाणून स्टेप-बाय-स्टेप प्रोसेसचा
रोबोट 2.0:
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांच्या रोबोट 2.0 या सिनेमाने भारतासोबतच जगभरात 500 कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आहे. टेक्नोलॉजी माणसांवर आणि त्यासोबत निसर्गातील पक्षी आणि प्राण्यांवर कश्याप्रकारे हावी होऊ शकतो याच्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात रजनीकांत यांनी डॉ. वसीगरण आणि चिट्ठी रोबोट अशी दुहेरी भूमिका साकारली आहे. अक्षय कुमारनेदेखील या चित्रपटांत डॉ. रिचर्ड आणि पक्षीराजन अशी दुहेरी भूमिका साकारली आहे तर एमी जॅक्सनने या चित्रपटांत नीला रोबोटची भूमिका साकारली आहे.
तेरी बातों में ऐसा उलझा जिया:
बॉलीवूड स्टार्स कृती सेनन आणि शाहिद कपूर यांनी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारले आहे. हा चित्रपट टेक्नोलॉजी आणि रोमँटिक कॉमेडी याच्यावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटांत कृतीने सिफ्रा नावाच्या रोबोटची भूमिका साकारली आहे, शाहिद कपूरने आर्यनची भूमिका साकारली आहे जो रोबोटिक्स इंजीनियर असतो. आर्यन त्याच्या मावशीच्या कंपनीमध्ये काम करत असतो. डिम्पल कपाडिया उर्मीला बेदीची भूमिका साकारली आहे. एका कार्यक्रमादरम्यान आर्यन सिफ्राला भेटतो आणि तिच्या प्रेमात पडतो. काही दिवसानंतर त्याच्या लक्षात येते की सिफ्रा रोबोट असते. ज्यामुळे त्याला खूप वाईट वाटू लागते. त्यानंतर तो अमेरिकेतून भारतात परततो आणि एका अनोळख्या मुलीसोबत लग्न करायला तयार होतो. मात्र, आर्यनने भारतामध्ये सिफ्राचे निरीक्षण करण्यासाठी तिला भारतात बोलावतो. नेमके लग्नाच्या दिवशी सिफ्रामध्ये बिघाड होतो ज्यामुळे गोंधळ निर्माण होतो. इथूनच हा चित्रपट या कथेच्या अवती भवती फिरतो. सिफ्रासारख्या रोबोटमध्ये अजूनही सुधारणेची गरज आहे असे सुचवून चित्रपटाचा शेवट होतो. या चित्रपटाने 133.64 कोटींची कमाई केली.
रा.वन:
बॉलीवूडचा किंगखान म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान, अर्जुन रामपाल, अरमान वर्मा आणि करीना कपूर यांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटांत शाहरुख खानने शेखर सुब्र्हमन्यम आणि जी.वन अशी दुहेरी भूमिका साकारली आहे, करीना कपूरने सोनिया सुब्र्हमन्यमची भूमिका साकारली आहे, अर्जुन रामपाल रा.वन नावाच्या रोबोट असलेल्या व्हिलनची भूमिका साकारली आहे, तर अरमान वर्मा प्रतिक सुब्र्हमन्यम म्हणजेच लुसिफरची भूमिका साकारली आहे. या चित्रपटांत शेखर आणि सोनिया आपल्याला मुलाला म्हणजेच प्रतिकला खुश करण्यासाठी एक विशेष गेमची निर्मिती करतो ज्यामध्ये दोन प्रकारचे रोबोट असतात ज्यामधील एकाचे नाव जी.वन असतो आणि दुसऱ्याचे नाव रा.वन असतो. मात्र यामध्ये एक विशेष गोष्ट ट्विस्ट असते ज्यामध्ये रा.वन नावाचा रोबोट जास्त शक्तिशाली असतो. अशाप्रकारे हा चित्रपट या सर्व गोष्टींच्या अवतीभवती फिरतो. मात्र चित्रपटाच्या शेवटी जी.वन जो हिरो असतो त्याचा विजय होतो.
हेही वाचा: आता शेतीतही होणार AI चा वापर! Artificial Intelligence च्या मदतीने शेतकरी करू शकतात 'ही' काम