Monday, September 01, 2025 09:11:09 AM

Kunal Kamra Controversy: कुणाल कामराच्या अडचणीत वाढ! विधानपरिषदेने स्विकारली विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस

विधान परिषदेने गुरुवारी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या 'देशद्रोही' वक्तव्याबद्दल त्यांच्याविरुद्धची विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस स्वीकारली आहे.

kunal kamra controversy कुणाल कामराच्या अडचणीत वाढ विधानपरिषदेने स्विकारली विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस
Kunal Kamra
Edited Image

Kunal Kamra Controversy: महाराष्ट्र विधान परिषदेने गुरुवारी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या 'देशद्रोही' वक्तव्याबद्दल त्यांच्याविरुद्धची विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस स्वीकारली असून ती विशेषाधिकार समितीकडे पाठवली. यासंदर्भात वरिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष राम शिंदे यांनी माहिती दिली. हा वाद खार येथील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये कामराच्या अलिकडच्या कार्यक्रमातून निर्माण झाला आहे, जिथे त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत एक विडंबनात्मक गाणे सादर केले. या कृत्यामुळे शिवसेना समर्थकांमध्ये संताप निर्माण झाला आणि त्यांनी कामरा यांनी गाणे रेकॉर्ड केलेल्या स्टूडिओची तोडफोड केली. 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, मी कुणाल कामरा आणि शिवसेना (यूबीटी) नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्धची विशेषाधिकार भंगाची नोटीस स्वीकारली असून ती विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष प्रसाद लाड यांच्याकडे पाठवली आहे. या प्रस्तावाबाबत पुढील कारवाई समिती ठरवेल. बुधवारी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात सूचना मांडली होती. 

हेही वाचा - Kunal Kamra Targets Nirmala Sitharaman: एकनाथ शिंदेनंतर कुणाल कामराचा निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा; नवीन व्हिडिओद्वारे केली टिप्पणी

तथापि, प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे की, कुणाल कामरा यांनी एक गाणे गायले ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वैयक्तिक आणि अपमानजनक संदर्भ होते. त्यांनी आरोप केला की शिवसेना (यूबीटी) नेते अंधारे यांनी निषेधाचे समर्थन केले आणि आक्षेपार्ह भाषा वापरली, जी सभागृहाचा अवमान आहे. कामरा आणि अंधारे दोघांनीही त्यांच्या टिप्पण्यांद्वारे विधिमंडळ संस्थांच्या प्रतिष्ठेचा अनादर केला, असं मत दरेकर यांनी मांडलं. गेल्या वर्षी विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले भाजपचे आमदार प्रसाद लाड आता इतर समिती सदस्यांसह सूचनेचा आढावा घेतील. विधान परिषदेच्या नियमांनुसार, जर समितीला तक्रारीत तथ्य आढळले तर तो प्रस्ताव सभागृहात चर्चेसाठी आणता येतो. 

हेही वाचा - Kunal Kamra Controversy: मुंबई पोलिसांकडून कुणाल कामराला समन्स; चौकशीसाठी हजर राहावे लागणार

सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध विशेषाधिकार भंगाची सूचना - 

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवल्याबद्दल शिवसेना यूबीटीच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध राज्य विधानसभेत विशेषाधिकार भंगाची सूचना सादर केली. अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बोरानारे यांच्या सूचनेचे समर्थन केले. तथापि, अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या सूचनेवर निर्णय घेतील, असे पीठासीन अधिकारी संजय केळकर यांनी सांगितले.


सम्बन्धित सामग्री