मुंबई: दिवंगत कलाकार राज कपूर यांच्या 100 व्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज कपूर कुटूंबाची भेट घेतली. यावेळी करिना कपूर, करिष्मा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट, आणि संपूर्ण कपूर कुटूंब उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी या ऐतिहासिक प्रसंगाच्या निमित्ताने राज कपूर यांच्या योगदानाची प्रशंसा केली आणि त्यांच्या कार्याला उजाळा दिला.

राज कपूर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वपूर्ण आणि अविस्मरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांचे चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही लोकप्रिय झाले. त्यांच्या "आग" आणि "श्री 420" सारख्या चित्रपटांनी भारतीय चित्रपटाला एक नवा आकार दिला. मोदींनी राज कपूर यांच्या कला आणि त्यांच्या कार्याचा आदर व्यक्त केला, तसेच त्यांच्या योगदानामुळे भारतीय चित्रपटसृष्टीला जगभर ओळख मिळाली असल्याचे म्हटले.

राज कपूर यांच्या कुटूंबीयांसोबत मोदींनी विविध आठवणींना उजाळा दिला. यावेळी राज कपूर यांच्या चित्रपटांच्या संगीताचा आणि अभिनयाचा गौरवही केला.