Wednesday, September 03, 2025 09:37:49 PM

'लोक मला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहेत'; बेपत्ता होण्याच्या बातम्यांदरम्यान रणबीर इलाहाबादियाचे वक्तव्य

रणवीरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एख पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की, 'लोक मला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहेत. एवढेच नाही तर लोक माझ्या कुटुंबाला इजा करण्याबद्दलही बोलत आहेत.

लोक मला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहेत बेपत्ता होण्याच्या बातम्यांदरम्यान रणबीर इलाहाबादियाचे वक्तव्य
Ranveer Allahbadia
Edited Image

युट्यूबर रणवीर इलाहाबादिया गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पालकांच्या शारीरिक संबंधांबद्दल अश्लील  प्रश्न विचारल्याबद्दल रणवीरवर टीका होत आहे. अशा परिस्थितीत शनिवारी त्याच्या बेपत्ता होण्याच्या बातम्या येत होत्या. ज्यामध्ये रणवीरचे घर बंद असल्याचे आणि त्याचा फोनही बंद असल्याचे सांगण्यात आले. या बातम्यांदरम्यान आता रणवीरचे विधान समोर आले आहे. रणवीरने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एख पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की, 'लोक मला जीवे मारण्याची धमकी देत ​​आहेत. एवढेच नाही तर लोक माझ्या कुटुंबाला इजा करण्याबद्दलही बोलत आहेत. लोक माझ्या आईच्या क्लिनिकमध्येही रुग्ण असल्याचे भासवून घुसले आहेत.'

मी कुठेही पळून जात नाहीये - रणवीर इलाहाबादिया 

रणवीर इलाहाबादियाने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांने लिहिले आहे की, 'मी आणि माझी टीम सतत पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. मी उर्वरित तपासात पूर्ण सहकार्य करेन आणि सर्व एजन्सींच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. पालकांच्या शारीरिक संबंधांबद्दल माझे प्रश्न अश्लील आणि अपमानास्पद होते. चांगले काम करणे ही माझी जबाबदारी आहे आणि मी माझ्या प्रश्नांसाठी माफी मागतो. मला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत आणि लोक माझ्या कुटुंबाला हानी पोहोचवू इच्छितात. लोक रुग्ण असल्याचे भासवून माझ्या आईच्या क्लिनिकमध्ये घुसले. मला खूप भीती वाटतेय आणि आता काय करावे हे कळत नाहीये. पण मी कुठेही पळून जात नाहीये. मला पोलिस आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.'

हेही वाचा - रणवीर अल्लाहबादियाने अल्पावधीतच गमावले 'इतके' लाख सबस्क्रायबर्स; ब्रँडिंग डीलवरही होऊ शकतो परिणाम

दरम्यान, रणवीर अलाहाबादिया बेपत्ता झाल्याचे बोलले जात होते. रणवीरने त्याचा फोन बंद केला असून त्याच्या घराला कुलूप आहे. तसेच, त्यांच्या वकिलाशी संपर्क होऊ शकला नाही. यानंतर, रणवीर या संपूर्ण प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवू इच्छितो, अशी अटकळ बांधली जात होती. पण आता शनिवारी संध्याकाळी रणवीरने त्याच्या बेपत्ता होण्याचे आणि फोन बंद करण्याचे कारण लोकांसोबत शेअर केले आहे. त्याने पोलिस आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे. 

हेही वाचा - Chhaava Review : चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'महाराष्ट्राला कायम गद्दारीने... नाहीतर, औरंगजेब...'

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण यूट्यूबवरील 'इंडियाज गॉट लेटेंट' या कॉमेडी शोशी संबंधित आहे. हा कार्यक्रम स्टँड-अप कॉमेडियन समय रैना यांनी होस्ट केला होता. या शोमध्ये पाहुणा म्हणून आलेल्या युट्यूबर रणवीर अल्लाहबादियाने या शोच्या स्पर्धकांना पालकांमधील शारीरिक संबंधांबद्दल 3 आक्षेपार्ह प्रश्न विचारले. या प्रश्नांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताच काही लोकांनी त्यावर आक्षेप घेतला आणि हळूहळू प्रकरण चिघळू लागले. आसाम आणि महाराष्ट्रातील काही लोकांनी रणवीर अलाहबादियाविरुद्ध एफआयआर दाखल केला. 

याशिवाय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वाश्रम यांनी या विधानावर कारवाई करण्याबद्दल बोलले होते. पोलिसही या प्रकरणाचा तपास करत होते. दरम्यान, रणवीर अलाहाबादिया बेपत्ता झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. ज्यामध्ये असे म्हटले जात होते की, रणवीरने त्याचा फोन बंद केला आहे असून तो बेपत्ता झाला आहे. परंतु, आता रणवीरने या सर्व बातम्यांचे खंडण करून स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच आपण पोलिसांना सहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे. 


सम्बन्धित सामग्री