प्रसाद काथे, मुंबई: #Metoo प्रकरणामुळे चर्चेत आलेली बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच तिने समाज माध्यमांमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आणि आपल्याला छळ होत असल्याचे सांगितले. तनुश्रीने तिला तिच्याच घरात छळ होत असल्याचे सांगत हा व्हिडीओ व्हायरल केला. या व्हिडिओमध्ये ती ढसाढसा रडत होती. त्यामुळे सिनेसृष्टीत खळबळ माजली. या व्हिडिओमध्ये तनुश्रीने नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या घरी पोलीस आले.
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने बुधवारी समाज माध्यमात एक व्हिडीओ टाकून खळबळ माजवली. यात तिने स्वतःचा छळ होत असल्याचे म्हटले. पोलिसांनी या वक्तव्याची दखल घेत तनुश्रीला गाठलं. यावेळी मुंबई पोलिसांना दारात पाहून तिची चिडीचूप झाली. पोलीस तनुश्रीने पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या चौकशीसाठी आले होते. पोलिसांनी तिच्या व्हिडिओची चौकशी केली.
हेही वाचा: पुरुषांसाठीची गर्भनिरोधक गोळी लवकरच ?
व्हिडिओनंतर तनुश्री दत्ताच्या घरी थडकले पोलीस
अभिनेत्री तनुश्री दत्ता तिच्या रडणाऱ्या व्हिडिओमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. या व्हिडिओतून तिने तिला स्वत:च्याच घरी त्रास होत असल्याचे सांगितले. या संपूर्ण प्रकारानंतर पोलीस तनुश्री दत्ताच्या घरी थडकले. यावेळी पोलिसांनी मॅडम, हा व्हिडीओ तुमचाच आहे का? असा प्रश्न तनुश्रीला विचारला. त्यावर होय असं तिने म्हटले. मॅडम, या व्हिडिओत जे सांगताय ते खरं आहे का? विचारल्यावरही तनुश्रीने होय असे उत्तर दिले. त्यावर पोलिसांनी मॅडम, या व्हिडिओत जे सांगताय ते खरं आहे का? असे विचारले. यावर मी व्हिडिओत बोलले आहे असे उत्तरादाखल बोलताना तनुश्रीने म्हटले.
पोलिसांनी मॅडम, तक्रार द्या. म्हणजे चौकशी करतो असे म्हटल्यानंतर म्हणजे? मी बोलले आहे ना सगळे व्हिडिओत असे उत्तर तनुश्रीने दिले. तनुश्रीने व्हिडिओमध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी तुमची तक्रार स्पष्टपणे कुणाविरोधात आहे? असा प्रश्न तनुश्रीला केला. त्यावर मला आता अधिक काही बोलायचे नाही असे उत्तर तनुश्री दत्ताने दिले. तनुश्री दत्ताच्या अशा वागण्यामुळे मुंबई पोलीस रिकाम्या हाती परतले. मात्र, यामुळे काही प्रश्न उपस्थित होतात.
तनुश्री आणि पोलिसांनमधील संभाषण
पोलीस - मॅडम, हा व्हिडीओ तुमचाच आहे का?
तनुश्री - होय
पोलीस - मॅडम, या व्हिडिओत जे सांगताय ते खरं आहे का?
तनुश्री - होय
पोलीस - मॅडम, तुमचा कुणाकडून छळ होतोय?
तनुश्री - मी व्हिडिओत बोलले आहे.
पोलीस - मॅडम, तक्रार द्या. म्हणजे चौकशी करतो.
तनुश्री - म्हणजे? मी बोलले आहे ना सगळे व्हिडिओत.
पोलीस - तुमची तक्रार स्पष्टपणे कुणाविरोधात आहे?
तनुश्री - मला आता अधिक काही बोलायचे नाही.