सोशल मीडियावर आपली वेगळी छाप पाडणारी युट्यूबर आणि अभिनेत्री प्राजक्ता कोळी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या चाहत्यांमध्ये या आनंदवार्तेची जोरदार चर्चा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा साखरपुडा पार पडला होता आणि आता ती 25 तारखेला विवाहसोहळा संपन्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
प्राजक्तानं आपल्या करिअरची सुरुवात एक युट्यूबर म्हणून केली. ‘मोस्टली साने’ या नावाने ती लोकप्रिय झाली आणि बघता बघता बॉलिवूडपर्यंत तिचा प्रवास पोहोचला. फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवणं, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती घेणं, तिच्या अफाट लोकप्रियतेचा दाखला आहे. प्राजक्ताच्या घरात सध्या लग्नसोहळ्याची लगबग सुरू झाली आहे. पारंपरिक पद्धतीने तिच्या लग्नाचे सगळे विधी पार पडणार आहेत. हळद, मेहंदी, संगीत अशा साऱ्या कार्यक्रमांना आता सुरुवात होईल.
होणारा नवरा आहे तरी कोण?
काही रिपोर्ट्सनुसार प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी अद्याप फारशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, प्राजक्ताचा होणारा पती नेपाळमधील काठमांडू इथला आहे, प्राजक्ता अनेकदा त्याच्या घरी काठमांडूला गेली होती.तो तिच्या क्षेत्राशी संबंधित असून त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल्याची चर्चा आहे.प्राजक्ताचा लग्नसोहळा अत्यंत खास आणि जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत पार पडणार आहे. कर्जतमध्ये या ग्रँड सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तिच्या चाहत्यांना मात्र तिच्या नव्या आयुष्याची उत्सुकता लागून राहिली आहे.