Wednesday, August 20, 2025 09:32:45 AM

33 कोटी देवांच्या यादीत नवीन एका देवाची वर्णी

राजनीकांत भक्ताने त्यांच्या 74 व्या वाढदिवसानिम्मित त्यांच्या पुतळ्याचं अनावरण

33 कोटी देवांच्या यादीत नवीन एका देवाची वर्णी 

तामिळनाडू -  भारत वैविध्यतेने भरलेला देश आहे. प्रत्येक 15 किलोमीटरवर भाषा बदलणाऱ्या या देशात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या रूढी परंपरा आहेत. भारताची संस्कृती प्रत्येक माणसाला त्याच्या रूढी परंपरा जपण्याची मुभा देखील देते. अश्याच एका सिने प्रेमीने एका खास दैवतचं मंदिर उभारलं आहे. आज 12 डिसेंबर सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणाच्या दुनियेतील 3 धुरंधर राजनीकांत, युवराज सिंह आणि शरद पवार यांचा वाढदिवस. या तिघांचा संपूर्ण देशभर चाहता वर्ग आहे. अश्याच एका राजनीकांत यांचा चाहत्याने त्यांसाठी एक मंदिर उभारले आहे. 

दक्षिण भारतीयांचं सिनेमासाठीचं प्रेम आणि सिनेकलाकरांसाठीचं प्रेम कुठेच लपून  राहिलं नाही आहे. अश्याच एका राजनीकांत भक्ताने त्यांच्या 74 व्या वाढदिवसानिम्मित त्यांच्या पुतळ्याचं अनावरण केले. मदुराईच्या थिरुमांगलम येथील "अरुल्मिगु श्री रजिनी मंदिर" येथे  हा खास पुतळा ठेवण्यात आला आहे. हा पुतळा रजनीकांत यांच्या 'मप्पिलई' चित्रपटातील त्यांचं प्रसिद्ध पात्र दाखवतो, ज्याद्वारे सिनेमा क्षेत्रातल्या त्याच्या अपार योगदानाला सन्मानित करण्यात आले आहे. या पूर्वी देखील राजनीकांत यांच्या चाहत्यांनी अनोख्या पद्धतीने त्यांचे राजनकांसाठीचं प्रेम व्यक्त केलेले आहे. 

राजनीकांत हे आज 74 वर्षाचे झाले आहेत. त्यांनी एन्थिरन, कबाली, बाशा, शिवाजी: द बॉस, थालापती आणि पदैयप्पा असे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्यांनी तामिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी आणि कन्नड या भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. रजनीकांत यांचा 'क्रेझ' जगभरातील लाखो चाहत्यांमध्ये आहे. तामिळ सिनेमापासून ते हिंदी आणि इतर भाषांमध्ये त्यांची लोकप्रियता अविरत वाढत गेली आहे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यांच्या अदा, संवाद फेक आणि स्टाईलने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. त्यांची "सुपरस्टार" ही उपाधी त्यांच्या अभिनयाच्या ताकदीची साक्ष देणारी आहे. 


सम्बन्धित सामग्री