Sunday, August 31, 2025 07:45:52 PM

Ram Charan Birthday: पुष्पाला तोड देण्यासाठी राम चरणचा नवा लूक आला समोर; पहा

दाक्षिणात्य अभिनेता रामचरण तेजा यांच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी गुरुवारी, 27 मार्च 2025 रोजी बहुप्रतीक्षित चित्रपट 'पेड्डी' या नव्या चित्रपटाचा पहिला लूक रिलीज केला आहे.

ram charan birthday पुष्पाला तोड देण्यासाठी राम चरणचा नवा लूक आला समोर पहा

दाक्षिणात्य अभिनेता रामचरण तेजा यांच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी गुरुवारी, 27 मार्च 2025 रोजी बहुप्रतीक्षित चित्रपट 'पेड्डी' या नव्या चित्रपटाचा पहिला लूक रिलीज केला आहे. दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या 'पेड्डी' चित्रपटाचे नाव आधी आरसी16 (RC16) होते. मात्र, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अद्याप गूढच आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता रामचरण तेजा सोबतच बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे. रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये, रामचरण हुबेहूब 'पुष्पा' सारखा दिसत आहे. राम चरणला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना या चित्रपटाचे शीर्षक 'पेड्डी' जाहीर केले. या चित्रपटातील अभिनेत्याचा पहिला लूक समोर आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 


'पुष्पा' लूकमध्ये दिसला राम चरण:

गुरुवारी, 27 मार्च 2025 रोजी दाक्षिणात्य अभिनेता राम चरण त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाचे निमित्त साधून चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना भेट म्हणून चित्रपटाचे शीर्षक आणि त्यासोबतच, अभिनेत्याचा पहिला लूक रिलीज केला आहे. अभिनेत्याचा हा दमदार लूक 'पुष्पा' चित्रपटातील अल्लू अर्जुन सारखा आहे. तीक्ष्ण डोळे, विखुरलेले केस, न सुटलेली दाढी आणि नाकातील अंगठी त्याला एक तीव्र अवतारात दाखवत आहे. 


चित्रपटाचे दुसरे पोस्टरही जबरदस्त आहे:

चित्रपटाच्या दुसऱ्या पोस्टरमध्ये राम चरणने हातात जुनी क्रिकेटची बॅट धरलेले दाखवले आहे. त्याच्या मागे, फ्लडलाइट्सने उजळलेले गावातील स्टेडियम आहे. हे चित्र ग्रामीण आणि मनोरंजक नाटकाकडे बोट दाखवणारे आहे.


'पेडी' चित्रपटातील मुख्य कलाकार:   

अभिनेता राम चरणचा आगामी 'पेडी' चित्रपटाचे बजेट जास्त असून या चित्रपटात राम चरणसोबत जान्हवी कपूर, शिव राजकुमार, जगपती बाबू आणि दिव्येंदू शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन बुची बाबू सना यांनी केले आहे. हा चित्रपट आणखी खास असणार आहे. कारण या चित्रपटात, कन्नड सिनेमाचे मेगास्टार शिवा राजकुमार महत्वाची भूमिका साकारत आहे. त्यासोबतच, ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी चित्रपटाला संगीत देण्याची जबाबदारी घेतली आहे. नुकतेच, हैदराबादमध्ये अभिनेता राम चरणच्या आगामी 'पेडी' चित्रपटाचे शेड्यूल पूर्ण झाले आहे. शूटिंग पूर्ण होताच त्याचा पहिला लुक रिलीज करण्यात आला.


सम्बन्धित सामग्री