Sunday, August 31, 2025 06:57:36 AM

Sikandar Trailer Launch: सलमान खानचा आगामी चित्रपट लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

गेल्या काही वर्षांपासून चाहते सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते. मात्र नुकताच गुरुवारी या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यामुळे चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली.

sikandar trailer launch सलमान खानचा आगामी चित्रपट लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीस

गेल्या काही वर्षांपासून चाहते सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते. मात्र नुकताच गुरुवारी या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली. या चित्रपटांत सलमान खान पुन्हा एकदा दमदार अभिनय आणि अ‍ॅक्शन करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे डायलॉग, सिनेमॅटोग्राफी, त्यासोबत सलमान खानने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनात वेगळीच छाप सोडत आहेत. या चित्रपटांत रश्मिका मंदाना, बाहुबली चित्रपटामध्ये साकारलेला कटाप्पा उर्फ सत्यराज आपल्याला खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

सिकंदर चित्रपटाच्या टीझर मध्ये काय पाहायला मिळेल?

ट्रेलरच्या सुरुवातीला सलमान खान, 'आज्जीने नाव सिकंदर ठेवलं होतं, आजोबांनी संजय, आणि प्रजाने राजासाब', 'हिसाब नही इन्साफ करने आया हूँ', 'कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल' असे दमदार डायलॉग म्हणतात. आणि मग आपल्याला दमदार म्युझिक ऐकायला मिळतो. सोबतच सलमान खान आपल्याला गुंडांसोबत मारामारी करतानासुद्धा पाहायला मिळतो. 'स्मशानमध्ये राहा किंवा कब्रिस्तानमध्ये राहा' डायलॉग म्हटल्यावर टीझरमध्ये एन्ट्री होते रश्मिका मंदानाची. ज्यात रश्मिका,'माझ्या शत्रूंमध्ये तुम्ही एवढे प्रसिद्ध आहात' असे सलमान खानला उद्देशून बोलते. एक मिनिटे एकवीस सेकंदाच्या ट्रेलरमध्ये आपल्याला 28 वर्षांची रश्मिका मंदाना आणि 59 वर्षांच्या सलमान खानमध्ये रोमान्स पाहायला मिळत आहे. 

हेही वाचा: “Mrs. Katrina Kaif!” ऑस्ट्रियातील परफेक्ट व्हेकेशनचे फोटो पाहून चाहते फिदा
 

एक्सवर चाहत्यांची प्रतिक्रिया:

एक्सवर चाहत्यांची मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेक प्रेक्षकांनी चित्रपटाच्या ट्रेलरचे कौतुक करत म्हणतात, '#सिकंदर चा ट्रेलर आला आहे आणि धुमाकूळ घालत आहे #सलमानखान चा स्वैग, ऍक्शन चा तडका, आणि तो रुबाबदार अंदाज - सर्वकाही या टीझरमध्ये आहे. कारण हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर व्हायरसप्रमाणे पसरणार आहे!' तर अनेक नेटिझन्सनी या चित्रपटावर मीम्सद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही नेटिझन्सनी या चित्रपटांला ऍक्टर प्रभासच्या सीनची कॉपी केल्याचे आरोप करत आहेत. तर काही नेटिझन्सनी या चित्रपटाला विजय थालापतीच्या 'सरकार' चित्रपटाची कॉपी केल्याचे आरोप देखील व्हिडिओद्वारे शेअर केले. 

हेही वाचा: पद्मश्री उशिरा मिळाल्याने खंत? अशोक सराफांचे उत्तर आश्चर्यचकित करणारे!
 

सिकंदर चित्रपट कधी रिलीज होणार?

हा चित्रपट नेमकं कधी रिलीज होणार याची माहिती अजून शेअर केली नाही. मात्र टीझरनुसार सिकंदर चित्रपट 2025 च्या ईदला रिलीज होणार आहे. सिकंदर चित्रपटाचा टीझर कमी वेळातच व्हायरल झालाय. या चित्रपटांत सलमान खान आपल्याला संजय राजकोट या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरुगोदास यांनी केली आहे तर  साजिद नाडियादवाला यांनी निर्मिती केली आहे.


सम्बन्धित सामग्री