Sunday, August 31, 2025 01:53:04 PM

Shraddha Kapoor Birthday: अभिनेत्री श्रद्धा कपूरबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहे?

गेल्या अनेक वर्षांपासून अनेक नव्या अभिनेत्रींनीं बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. अशातच आज आपण जाणून घेणार आहोत कोण आहे ती अभिनेत्री जी स्वतःच्या हिंमतीवर गेले आठ वर्ष बॉलीवूडमध्ये टिकून आहे.

shraddha kapoor birthday अभिनेत्री श्रद्धा कपूरबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहे

बॉलीवूड म्हटल्यावर आपल्यासमोर येतात ग्लॅमरस अभिनेत्री, मसालेदार सिनेमा आणि दबंग अभिनेता. बॉलीवूडमध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टींबद्दल चाहत्यांमध्ये  उत्सुकता असते. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक नव्या अभिनेत्रींनीं बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकांना चाहते अक्षरशः डोक्यावर घेतात. मागील काही वर्षांत चित्रपट निर्माते करण जोहरने अनेक स्टारकिड्सना लाँच केले. मात्र असे देखील काही स्टारकिड्स आहेत ज्यांना करण जोहरने लाँच नाही केले. त्यांना इतर प्रोडक्शन कंपन्यांद्वारे लाँच करण्यात आले. अशातच आज आपण जाणून घेणार आहोत कोण आहे ती अभिनेत्री जी स्वतःच्या हिंमतीवर गेले आठ वर्ष बॉलीवूडमध्ये टिकून आहे. 

हेही वाचा: Kantara Film: कांतारा चित्रपटांत दाखवलेल्या पंजुर्ली देवता कोण आहेत?

कोण आहे श्रद्धा कपूर?

श्रद्धा कपूरचा जन्म 3 मार्च 1987 रोजी मुंबईमध्ये झाला. श्रद्धा कपूरची आई शिवांगी कोल्हापुरे अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण आहे, वडील अभिनेता  शक्ती कपूर आहेत ज्यांनी बोललीवूडमध्ये व्हिलनची भूमिका साकारली आहे. श्रद्धा कपूरला एक भाऊ आहे ज्याचे नाव सिद्धांत कपूर आहे. सिद्धांतने शूट आऊट एट वडाळा मध्ये अभिनेता म्हणून काम केले. 

लहापानापासूनच अभिनेत्री होण्याचे स्वप्न:

वडील शक्ती कपूर प्रसिद्ध अभिनेते, तर मावशी पद्मिनी कोल्हापुरे आणि स्वर्गीय गानसम्राज्ञी लता मंगेशकर अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्या नातेवाईक होत्या. घरच्यांकडून अभिनयाचा वारसा मिळाल्यामुळे लहानपणापासूनच श्राद्धा अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहत होती. अभिनेत्री बनण्यासाठी श्रद्धा सतत आरश्यासमोर सराव करायची. 

हेही वाचा: Celebrities Use These Perfumes: शाहरूख खान, रणवीर सिंह वापरतात या ब्रँडचे परफ्यूम

'हा' होता श्रद्धा कपूरचा पहिला चित्रपट:

श्रद्धाने 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तीन पत्ती' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात तिने अभिनेते अमिताभ बच्चन, आर. माधवन आणि बेन किंग्सले यांच्यासोबत काम केले. मात्र हा चित्रपट फ्लॉप झाला. त्यानंतर 2011 मध्ये तिने यशराज बॅनरच्या 'लव का द एंड' चित्रपटात काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरीचा ठरला. मात्र त्यानंतर तिने यशराज फिल्म्सच्या तीन चित्रपटांचे करार मोडले. त्यामुळे यशराज फिल्म्स आणि करण जोहरसोबतचे संबंध खराब झाले. मात्र हार न मानता तिने 2013 मध्ये चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि दिग्दर्शक मोहित सूरी यांच्या 'आशिकी 2' मध्ये काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला आणि चित्रपटातील अभिनेता, अभिनेत्री एका रात्रीत जगप्रसिद्ध झाले.  
 
               नुकताच अभिनेत्री श्रद्धा कपूरने रणबीर कपूरसोबत 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपटात काम केले असून लवकरच अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्याला नव्या चित्रपटात पाहायला मिळेल. 

 


सम्बन्धित सामग्री