Sunday, August 31, 2025 06:45:59 AM

Sikandar Day 4 Box Office collection : सिकंदरने चौथ्या दिवशी 'दम' तोडला?, १०० कोटीचा आकडा गाठताना दमछाक

Sikandar Day 4 Box Office collection : सलमान खान अभिनित सिकंदर चित्रपट मोठी कमाई करण्यात अपयशी ठरत आहे. या चित्रपटाने चौथ्या दिवशी फक्त ९.७५ कोटी रूपयांची कमाई केली आहे.

sikandar day 4 box office collection  सिकंदरने चौथ्या दिवशी दम तोडला १०० कोटीचा आकडा गाठताना दमछाक
Sikandar Day 4 Box Office collection : सिकंदरने चौथ्या दिवशी 'दम' तोडला?, १०० कोटीचा आकडा गाठताना दमछाक

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित चित्रपट सिकंदर ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असतानाही या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. सुरुवातीला हा चित्रपट ठीकठाक प्रदर्शन करताना दिसला. पण चौथ्या दिवसापर्यंत सिंकदरच्या कमाईमध्ये घट झाल्याचं पहायला मिळत आहे. 

चित्रपट ट्रेड विश्लेषण करणाऱ्या सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सिकंदरने सुरुवातीच्या चार दिवसांत शंभर कोटीचा आकडा पार केलेला नाही. सिकंदरने पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी २६ कोटी रूपयांची ओपनिंग केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ झाली. दुसऱ्या दिवशी सिकंदरने २९ कोटी रूपयांचा गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी सोमवारी म्हणजे ईदच्या दिवशी कमाईत वाढ होईल अशी आशा होती. पण या दिवशी सिकंदरने १९.५ कोटी रूपये कमावले. 

चौथ्या दिवशी तर सिकंदरच्या कमाईत मोठी घट झाल्याचं पहायला मिळालं. चौथ्या दिवशी फक्त ९.७५ कोटी रूपये सिकंदरला कमावता आले. या आकड्यांनुसार चार दिवसांमध्ये सिकंदरने एकूण ८४.२४ कोटींची कमाई केली आहे.

हेही वाचा - अनुष्का शर्मा सोबत लग्न करण्यापूर्वी विराट कोहलीवर फिदा होत्या 'या' तरुणी

१०० कोटी क्लबमध्ये पोहोचण्याची शर्यत कठीण
सलमान खानसारख्या मोठ्या सुपरस्टारचा चित्रपट असून देखील सिकंदरने चार दिवसांत १०० कोटींचा टप्पा पार केलेला नाही. ईदच्या सुट्टीचा फायदा मिळण्याची अपेक्षा होती. परंतु अपेक्षित कमाई करण्यात सिकंदरला अपयश आलं आहे. सिकंदरच्या कमाईचे आकडे आणि प्रतिसाद बघता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काळ टिकण्याची शक्यता कमी आहे. सुरुवातीला चित्रपटाला मिक्स रिव्ह्यू मिळाले. 

काही समीक्षकांनी सिकंदरचे कथानक कमकुवत असल्याचे म्हटलं. तर काहींनी अॅक्शन आणि सलमानच्या फॅन बेसमुळे चित्रपट बऱ्यापैकी चालेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद आणि बॉक्स ऑफिसवरील कमाईतील घट यामुळे चित्रपटाचे भविष्य अंधारात असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. या आठवड्याच्या शेवटी म्हणजेच दुसऱ्या शनिवार-रविवारी चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल, अशी मेकर्संना आशा आहे.   

हेही वाचा - Director Sanoj Mishra Arrested: व्हायरल गर्ल मोनालिसाला चित्रपट ऑफर देणारा दिग्दर्शक सनोज मिश्राला बलात्कार प्रकरणात अटक

 


सम्बन्धित सामग्री