भारतीय चित्रपट म्हटल्यावर आपल्याला डोळ्यासमोर येतात बॉलीवूडचे तीन खान्स, शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान. गेल्या अनेक वर्षांपासून आपण पुरुष प्रधान चित्रपट पाहत आहोत. अनेक प्रेक्षक खास पुरुष प्रधान चित्रपट पाहण्यास चित्रपटगृहात येतात. मात्र अलीकडच्या काळात आपल्याला अनेक महिला-प्रधान चित्रपट पाहायला मिळत आहेत. ज्यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्याला एक नवीन बदल पाहायला मिळाले आणि त्यासोबतच आपल्याला नवनवे दर्जेदार चित्रपटदेखील पाहायला मिळाले. या चित्रपटांचे मुख्य उद्धिष्ट महिलांना सशक्त, मजबूत आणि प्रेरणा देण्यासाठी खास बनवला जातो. चला तर जाणून घेऊया कोण-कोणते आहेत ते प्रसिद्ध महिला-प्रधान चित्रपट, ज्यांना पाहून अनेक महिला आज त्यांच्या क्षेत्रात नाव कमवत आहेत.
हेही वाचा: Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: टप्पू सेनेचा गुप्त प्लॅन उघड होताच भिडेला आला संशय
1 - 'क्विन':
विकास बहल दिग्दर्शित 'क्वीन' हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा 'राणी' नावाच्या मुलीपासून सुरु होते जिचे लग्न ठरते आणि लग्नाच्या काहीच दिवसांपूर्वी तिचा होणारा नवरा लग्नाआधीच लग्न मोडतो. त्यामुळे अशा परिस्थितीत, राणी आणि तिच्या कुटुंबांना धक्का बसतो. मात्र, ती जराही न घाबरता एकटीच हनिमूनला जाण्याचा निर्णय घेते. इथूनच तिचा प्रवास सुरु होतो आणि यादरम्यान ती अनेक नवनवीन आणि अनोळख्या लोकांना भेटते आणि कशाप्रकारे ती एकटी प्रवास करते, ते या चित्रपटात दाखवले आहे. या चित्रपटात कंगना रणौत मुख्य भूमिकेत होती आणि राजकुमार रावही महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाला.
2 - 'बाईपण भारी देवा':
केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात सर्व स्त्रिया आपापल्या आयुष्यात अनेक कारणांनी व्यस्त आणि उदास असतात, मात्र जेव्हा एक जाहिरात येते ज्यामध्ये उत्कृष्ट झिम्मा खेळणाऱ्या जोडीला 1 लाख रुपये बक्षिस मिळणार, तेव्हा या सर्व स्त्रिया एकत्र येतात आणि इथूनच त्यांच्या संघर्षाची सुरुवात होते. या चित्रपटाच्या उत्कृष्ट कथेमुळे, आणि ज्या पद्धतीने या चित्रपटात स्त्रियांच्या संघर्षाला दाखवले आहे, त्यामुळे रसिकप्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे.
हेही वाचा: International Women's Day: भारताच्या इतिहासाला आकार देणाऱ्या महाराष्ट्रातील कणखर महिला
3 - 'झिम्मा':
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा' चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुहास जोशी, मृण्यमी गोडबोले आणि सुचेता बांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात सात स्त्रिया वेगवेगळ्या कौटुंबिक वातावरणातून लंडनला फिरायला जाण्यासाठी एकत्र येतात आणि त्यांचा या प्रवासात त्यांच्या आयुष्यातील वेदना, संघर्ष ज्याप्रकारे दर्शवला आहे, त्यामुळे या चित्रपटाला तमाम रसिक-प्रेक्षकांची पसंती पाहायला मिळत आहेत.