Wednesday, August 20, 2025 10:41:29 AM

अनेक सुपरहिट लावण्या सादर केल्यानंतर अमृता करणार हे पहिलं आइटम साँग !

सुपरहिट लावण्या सादर केल्या नंतर आता अमृता या चित्रपटात पहिल्यांदा आइटम साँग करणार असून तिच्या नृत्याची पुन्हा एकदा जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

अनेक सुपरहिट लावण्या सादर केल्यानंतर अमृता करणार हे पहिलं आइटम साँग

कायम चर्चेत असलेली अमृता पुन्हा एक खास सरप्राईझ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय ! अमृता ने तिच्या मित्र मंडळीच्या सिनेमांत एक खास गाणं केलं असून " चिऊताई चिऊताई दर उघड " अस या गण्याच नाव आहे. अमृता तिच्या अभिनय प्रवासात पहिल्यांदा आइटम साँग करणार आहे. कायम उत्तम भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य करून राहणारी अभिनेत्री असली तरी तिच्या नृत्याचे सगळेच चाहते आहेत यात शंका नाही. 

सुपरहिट लावण्या सादर केल्या नंतर आता अमृता या चित्रपटात पहिल्यांदा आइटम साँग करणार असून तिच्या नृत्याची पुन्हा एकदा जादू प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सुशीला- सुजीत मधल हे आइटम साँग नक्कीच काहीतरी कमाल आहे आणि नेहमी पेक्षा वेगळ्या रूपात अमृता या गाण्यात दिसतेय. तिचा नवा लूक आणि नव नाव यातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आजवर अमृताने अनेक सुपरहिट लावण्या सादर केल्या आणि त्यातून प्रेक्षकांना मोहित केलं आहे आता अमृता या नव्या आइटम साँग मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकणार यात शंका नाही. 

हेही वाचा : वंदन हो ने अमृता करणार नव्या वर्षाची सुरुवात

अमृताया गाण्यात तिच्या आवडत्या मित्रा सोबत म्हणजे गश्मीर महाजनी सोबत स्क्रीन स्पेस शेयर करणार आहे. सुशीला सुजीत मध्ये चिऊताई चिऊताई दार उघड हे गाणं नक्कीच धम्माल करून जाणार आहे असं दिसतंय. 

वैविध्यपूर्ण भूमिका असो किंवा कोणताही नृत्यप्रकार अमृता कायम तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांना मोहित करत आली आहे आणि आता पुन्हा एकदा या पहिल्या वहिल्या आइटम साँग मधून अमृता प्रेक्षकांना खिळवून ठेवणार यात शंका नाही !

 

'>http://

 


सम्बन्धित सामग्री






Live TV