Thursday, August 21, 2025 12:35:51 AM

Chhava Film Shooting Location: छावा चित्रपटाचे शूटिंग कुठे झाले तुम्हाला माहित आहे?

पण तुम्हाला हा प्रश्न तर नक्कीच पडला असेल आणि तो म्हणजे छावा चित्रपटाचे शूटिंग नेमके कुठे झाले आहे? चला तर आपण जाणून घेऊया या चित्रपटाचे शूटिंग कोणत्या ठिकाणी झाले आहे.

chhava film shooting location छावा चित्रपटाचे शूटिंग कुठे झाले तुम्हाला माहित आहे

14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट सध्या सर्वत्र मोठ्या उत्साहात गाजत आहे. चित्रपटाच्या कथेपासून ते अगदी कलाकारांनी साकारलेल्या उत्कृष्ट भूमिका आणि उत्तम सिनेमॅटोग्राफी यांसारख्या अनेक कारणांमुळे हा चित्रपट अनेकांच्या हृदयात अधिराज्य करत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य आणि पराक्रमी इतिहासावर आधारित हा चित्रपट असून अभिनेता विक्की कौशलने ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे त्याचे कौतुक करू तितके कमीच आहे. या चित्रपटांत छत्रपती संभाजी महाराज यांची बुद्धिमत्ता, अवघ्या राज्यभराचे कारभार त्यांनी कशाप्रकारे सांभाळले, त्यासोबतच त्यांनी मरण येईपर्यंत धर्मांतर न करता स्वराज्यासाठी त्यांनी केलेले बलिदानदेखील उत्तमप्रकारे दर्शवले आहे. 130 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या  छावा चित्रपटाने तीन दिवसांतच तब्बल 121 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटगृहांत छावा चित्रपट पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यांमध्ये येणारे अश्रू आणि अंगावर शहारे आणणारे क्षण, प्रेक्षकांचा जल्लोष हेच या चित्रपटाचे यश आहे असे अभिनेता विक्की कौशल आणि दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी म्हटले आहे. पण तुम्हाला हा प्रश्न तर नक्कीच पडला असेल आणि तो म्हणजे छावा चित्रपटाचे शूटिंग नेमके कुठे झाले आहे? चला तर आपण जाणून घेऊया या चित्रपटाचे शूटिंग कोणत्या ठिकाणी झाले आहे. 

1 - मेणवली घाट, वाई:

मेणवली घाट महाराष्ट्राच्या सातारा जिल्यामध्ये असलेल्या वाईमध्ये आहे. कृष्णा नदीकाठीजवळ वाई नावाचे गाव आहे. या ठिकाणी छावा चित्रपटाचे अनेक सीन शूट झाले असून विशेषतः छावा चित्रपटाच्या लढाईतील दृश्याचे शूटिंग इथे झाले आहेत. त्यासोबतच हेच ते ठिकाण आहेत जिथे गणोजी आणि कान्होजी शिर्के मुघलांसोबत मिळून छत्रपती संभाजी महाराजांना फसवतात आणि साखळदंडाने त्यांना बंदिस्त करतात असे दाखवले गेले आहे. या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग वाईमध्येच झाले आहे. 

हेही वाचा: तंत्रज्ञानावर बनवलेले 'हे' आहेत भारतातील प्रसिद्ध चित्रपट
 

2 - बारामोटेची विहीर:

छत्रपती संभाजी महाराज शिवलिंगाची जिथे पूजा आणि दुधाभिषेक करतात त्या सीनचे शूटिंग बारामोटेची विहीर या ठिकाणी झाले आहे. बारामोटेची विहीर ठिकाणाचे ऐतिहासिक महत्व आहे. हे ऐतिहासिक विहीर लिंब या गावात असून या ठिकाणाला 300 वर्षांपेक्षा जुना इतिहास आहे. लिंब या गावात ही ऐतिहासिक विहीर आहे. इ.स.वी.सन. 1719 ते 1724 या दरम्यान शाहू महाराजांची पत्नी वीरुबाई यांनी ही विहीर बांधली आहे. ही विहीर 100 फूट खोल आणि 50 फुट रुंद असून ही विहीर गावकऱ्यांसाठी आजही पाण्याचा स्रोत आहे. 

3 - मालाडमधील मढ:

चित्रपटांत जेव्हा छत्रपती संभाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन औरंगजेबाने वसवलेल्या गावावर आक्रमण करून तेथील सोने, चांदी आणि त्यासोबतच तेथील प्रत्येक वस्तू काबिज करतानाचे सीन आहेत, त्याचे शूटिंग मालाडमधील मढ या गावात झाले आहे.

हेही वाचा: नेटफिक्सवरील 'हे' आहेत सस्पेन्स-थ्रिलरयुक्त चित्रपट
 


सम्बन्धित सामग्री