Sunday, August 31, 2025 08:13:56 AM

वहीदा रहमानचे वडील म्हणायचे, 'मुलीला वेड लागलंय;' तर, नृत्यकलेतील गुरूंनी मागितली 'कुंडली'

वहीदा यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्या अनेकदा विचित्र गोष्टी करायच्या. त्या आरशात स्वतःला न्याहाळत बसायच्या आणि आरशात बघून अॅक्टिंग करायच्या. त्यांच्या कुटुंबाला ही बाब विचित्र वाटायची.

वहीदा रहमानचे वडील म्हणायचे मुलीला वेड लागलंय तर नृत्यकलेतील गुरूंनी मागितली कुंडली

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वहीदा रहमान यांनी एकामागून एक उत्कृष्ट चित्रपट केले. एक काल गाजवणाऱ्या वहीदा यांच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे सगळेच जण चाहते होते. वहीदा यांच्या Conversations with Waheeda Rehman या पुस्तकात त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक किस्से उलगडले आहेत.

आरशात पाहण्यामुळे वडील वैतागले होते
ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनी लहानपणीची एक आठवण सांगितली.  वहीदा यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि त्यामुळे त्या अनेकदा विचित्र गोष्टी करायच्या, ज्यामुळे तिचे वडीलही वैतागून जायचे. वहीदा आरशात स्वतःला न्याहाळत बसायच्या आणि आरशात बघून अॅक्टिंग करायच्या. त्यांच्या कुटुंबाला ही बाब विचित्र वाटायची. एके दिवशी त्यांच्या वडिलांनी त्यांना असे करण्याविषयी विचारले. तर, यावर वहीदा यांनी वडिलांना सांगितले की, जेव्हा मी हसते, तेव्हा जग हसले पाहिजे आणि जेव्हा मी रडते, तेव्हा जग रडले पाहिजे, असे मला वाटते. एका 'चॅट शो'मध्ये बोलताना वहीदा यांनी ही गोष्ट सांगितली.

हेही वाचा - Valentine Week : 15 व्या वर्षी अभिनेत्री रेखासोबत सेटवर घडला होता असा प्रकार, कधीच लाभलं नाही 'खरं प्रेम'

ही मुलगी वेडी झाली आहे
लहानपणी त्या आरशात पाहून अभिनय करायच्या आणि हे पाहून त्यांचे वडील म्हणाले होते की, ही मुलगी वेडी झाली आहे. वहीदा यांच्या वडिलांनी त्यांच्या पत्नीला म्हणजेच वहीदा यांच्या आईला 'तिला नियंत्रणात ठेवा, तिची काळजी घ्या. नाहीतर, ती पूर्णच वेडी होईल,' असा इशारा दिला होता. लहानपणापासूनच वहीदा यांना नृत्य आणि अभिनयाची आवड होती. 

लहानपणीच कुटुंबाची जबाबदारी घेतली
वहीदा रहमान यांना लहानपणापासूनच कुटुंबाची जबाबदारी पेलावी लागली. त्या 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या चिमुकल्या खांद्यांवर आली. त्यानंतर लगेचच त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. वहिदा रहमान यांनी 17 वर्षांच्या असताना चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यांचा पहिला चित्रपट तेलुगू होता. तेलुगू चित्रपटामध्ये काम केल्यानंतर, त्यांनी दक्षिणेत काही चित्रपट केले आणि नंतर देव आनंदसोबत 'सीआयडी' चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी हळूहळू हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये 'गाईड', 'प्यासा', 'साहिब बीवी और गुलाम', 'दिल्ली-६', 'कागज के फूल' आणि 'नील कमल' यांचा समावेश आहे.

असामान्य नृत्य कौशल्य
वहीदा त्यांच्या अभिनयासोबतच नृत्यासाठीही प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या नृत्य कौशल्यामुळे त्यांना चित्रपट सृष्टीत प्रगती करण्यास खूप मदत झाली. त्यांनी भरतनाट्यम देखील शिकले. पण त्यासाठी त्यांना खूप अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांनी प्रसिद्ध नृत्यगुरू तिरुचंद्रम मीनाक्षी सुंदरम पिल्लई यांच्याकडून भरतनाट्यम शिकले. परंतु, सुरुवातीला त्यांच्या गुरूंनी त्यांना नृत्य शिकवण्यास नकार दिला होता.

मुस्लिम असल्याचे सांगून दिला नकार
वहीदा रहमान यांना फक्त तिरुचंद्रम मीनाक्षी सुंदरम पिल्लईकडून शिकायचे होते आणि जेव्हा त्या त्यांच्याशी बोलायला गेल्या, तेव्हा त्यांनी यासाठी नकार दिला की, वहीदा मुस्लिम आहे आणि त्या तिला नृत्य शिकवू शकत नाही. नृत्याचा हिंदू किंवा मुस्लिम असण्याशी काय संबंध आहे, असे वहीदा यांनी विचारले असता, पिल्लई म्हणाल्या की वहिदा पद्म आणि वर्णम भाव करू शकणार नाही.

हेही वाचा - Chhaava Review : चित्रपट पाहिल्यानंतर जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'महाराष्ट्राला कायम गद्दारीने... नाहीतर, औरंगजेब...'

गुरूंनी आधी वहीदा यांची कुंडली मागितली
जेव्हा वहीदा यांच्या मैत्रिणीने गुरू पिल्लई यांना खूप आग्रह केला, तेव्हा त्यांनी प्रथम त्यांना वहीदा रहमानची कुंडली आणण्यास सांगितले. वहीदा यांनी त्यांना सांगितले की, आपल्या समाजात कुंडली बनवल्या जात नाहीत. यावर गुरु म्हणाल्या की, ही एक मोठी समस्या आहे. यानंतर त्यांनी वहीदा यांची जन्मतारीख विचारली आणि स्वतःच त्यांची कुंडली बनवली. त्यानंतर त्या म्हणाल्या की, ही खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे. या कुंडलीवरून असे दिसून येते की, ही मुलगी माझी शेवटची आणि सर्वोत्तम विद्यार्थिनी असेल.


सम्बन्धित सामग्री