बॉलीवूडमध्ये सतत नवनवीन घडामोडी घडत असतात. अशातच, एक नवीनच बातमी समोर येत आहे. नुकताच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने 13 मार्च 2025 रोजी 60 वा वाढदिवस आपल्या राहत्या घरी केला. आमिर खानने आपल्या 60 व्या वाढदिवसात बॉलीवूडचा किंगखान शाहरुख खान आणि दबंग अभिनेता सलमान खान यांनादेखील बोलावले होते. 60 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर आमिर खानने त्याच्या रिलेशनशिपची कबुली दिली. यादरम्यान, आमिर खानने सांगितले की, 'मी माझ्या जुन्या मैत्रिणीला म्हणजेच गौरीला स्प्रॅटला डेट करत आहे'. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल आणि ते म्हणजे कोण आहे गौरी स्प्रॅट? ती काय करते? चला तर जाणून घेऊया आमिर खानच्या गर्लफ्रेंडबद्दल.
हेही वाचा: ओटीटी ते थिएटरपर्यंत 'हे' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
नेमकी कोण आहे आमिर खानची नवीन पार्टनर 'गौरी स्प्रॅट'?
गौरी स्प्रॅट ही बंगळुरूची रहिवासी आहे. गौरी अमीर खानच्या प्रॉडक्टशन बॅनरखाली काम करते. गौरीची आई तामिळ आहे तर वडील आयरिश आहे. इतकंच नाही, तर गौरीला सहा वर्षांचा लहान मुलगासुद्धा आहे. गौरी बंगळुरूमधील एका सलूनची मालकीण असणाऱ्या रीता स्प्रॅट यांची मुलगी आहे. गौरीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, गौरीने ब्लू माउंटन स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले. 2004 मध्ये गौरीने लंडनमधील कला विद्यापीठातून एफडीए स्टायलिंग आणि फोटोग्राफीचा फॅशन कोर्स केला आहे. सध्या, गौरी मुंबईमध्ये बीब्लंट सलून चालवत आहे. आमिर खानने खुलासा केला की, सध्या तो गौरीसोबत राहत आहे.
आमिर खानने घरच्यांना करून दिली गौरीची ओळख:
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण, गौरी आमिर खानच्या कुटुंबियांना भेटली आहे आणि आमिरचे कुटुंबीय त्यांच्या नात्याबद्दल आनंदी आहे.
मीडियापूर्वी आमिर खानने या अभिनेत्यांना करून दिली ओळख:
मीडियामध्ये ओळख करून देण्यापूर्वी आमिर खानने अभिनेता शाहरुख खान आणि सलमान खानसोबत बोलून गौरीची ओळख करून दिली.
गौरी स्प्रॅट आणि आमिर खान यांच्या नात्याला 1 वर्ष झालं:
गुरुवारी, 13 मार्च 2025 रोजी आमिर खानने पापाराझींसोबत 60 वा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान, त्याने पापाराझींसोबत संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. सोबतच, आमिर खानने गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटची ओळख करून दिली. आमिर खान म्हणाला, 'गेल्या 18 महिन्यांपासून आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये आहोत'. मात्र, अमीर खान गेल्या 25 वर्षांपासून गौरीला ओळखत आहे.