Sunday, August 31, 2025 07:02:32 AM

मुन्ना भैया उर्फ दिव्येंदु शर्माची पत्नी कोण आहे? जाणून घ्या

मिर्जापूर या वेब सिरीजमध्ये प्रचंड रागीट, आक्रमक आणि उत्तम भूमिका साकारणारा मुन्ना भैया उर्फ दिव्येंदु शर्माचे लग्नही झाले आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे मुन्ना भैया उर्फ दिव्येंदु शर्माची पत्नी.

मुन्ना भैया उर्फ दिव्येंदु शर्माची पत्नी कोण आहे जाणून घ्या

मुंबई: मिर्जापूर या वेब सिरीजमध्ये मुन्ना भैय्याची भूमिका करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. या अभिनेत्याचे नाव आहे दिव्येंदु शर्मा. 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारा अभिनेता दिव्येंदु शर्माला खूप संघर्ष करावा लागला. मात्र, त्याने मेहनत करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच, मिर्जापूर या वेब सिरीजमध्ये प्रचंड रागीट, आक्रमक आणि उत्तम भूमिका साकारणारा मुन्ना भैया उर्फ दिव्येंदु शर्मा त्याच्या वैयक्तिक जीवनात खूप शांत आणि प्रेमळ आहे. इतकच नाही, तर याचे लग्नही झाले आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे मुन्ना भैया उर्फ दिव्येंदु शर्माची पत्नी. 

दिव्येंदु शर्माच्या पत्नीचे नाव आहे आकांक्षा शर्मा. ती व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर आहे आणि तिला चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे आवडते. दोघांची पहिली भेट दिल्ली विद्यापीठाच्या किरोरीमल कॉलेजमध्ये झाली होती. दिव्येंदु तिथे राज्यशास्त्र शिकत होता आणि आकांक्षाही त्याच कॉलेजमध्ये शिकत होती. हळूहळू, दोघेही चांगले मित्र बनले आणि कॉलेजमध्ये ते अनेकदा एकत्र वेळ घालवू लागले. विशेष बाब म्हणजे आकांक्षाला प्रपोज करण्यासाठी दिव्येंदूला 7 वर्षे लागली. एका मुलाखतीत दिव्येंदूने सांगितले होते की, 'माझी पत्नी आकांक्षा माझी खूप चांगली मैत्रीण होती. आम्ही कॉलेजमध्ये एकत्र राहत होतो. मी तिची खूप काळजी घेऊ लागलो पण तिला सांगण्याचे धाडस करू शकलो नाही'. 

हेही वाचा: ट्विंकल आणि काजोलची जोडी करेल ओटीटीवर राज्य; नव्या टॉक शोची झाली घोषणा

पुढे, दिव्येंदु म्हणाला की, 'मला माझी मैत्री खराब करायची नव्हती. मला काळजी वाटत होती की प्रेमामुळे माझी मैत्री खराब होईल. मला प्रेमाची भावना होती, पण ती कशी व्यक्त करावी हे मला समजत नव्हते'. यामुळे, त्याने गेल्या 6-7 वर्षांपासून त्याच्या भावना लपवून ठेवल्या. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी दिव्येंदु जेव्हा मुंबईत आला, तेव्हा त्याला आकांक्षा किती आवडते हे जाणवले. या अंतरामुळे त्याला जाणवले की आकांक्षा त्याच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो तिच्याशिवाय राहू शकत नाही.

2011 मध्ये 'प्यार का पंचनामा' या चित्रपटातून दिव्येंदूने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हा, त्याने आकांक्षा समोर त्याच्या भावना व्यक्त केल्या. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केले. 28 जून 2012 रोजी ट्विट करून दिव्येंदूचा मित्र सिद्धार्थने हा आनंद शेअर केला होता. दिव्येंदुचा असा विश्वास आहे की, आजही त्यांच्या नात्यातील सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांची मैत्री आहे. तो म्हणाला, 'आकांक्षा माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. आम्हाला एकमेकांसोबत राहण्याचा आनंद मिळतो'. ही मैत्री त्यांच्या मजबूत वैवाहिक नात्याचा पाया आहे.


सम्बन्धित सामग्री