Sunday, August 31, 2025 02:16:11 PM

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 मोठे निर्णय! किसान संपदा योजनेसाठी 6520 कोटी मंजूर

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकरी आणि रेल्वेशी संबंधित 6 मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये 'प्रधानमंत्री किसान संपदा योजना' (PMKSY) अंतर्गत 1920 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 6 मोठे निर्णय किसान संपदा योजनेसाठी 6520 कोटी मंजूर
Edited Image

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकरी आणि रेल्वेशी संबंधित 6 मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये 'प्रधानमंत्री किसान संपदा योजना' (PMKSY) अंतर्गत 1920 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करून संपूर्ण योजनेचे बजेट आता 6520 कोटी इतके करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय - 

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेची एक घटक योजना असलेल्या एकात्मिक शीत साखळी आणि मूल्यवर्धन पायाभूत सुविधा अंतर्गत 50 बहु-उत्पादन अन्न विकिरण युनिट्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा अंतर्गत 100 NABL मान्यताप्राप्त अन्न चाचणी प्रयोगशाळा स्थापन केल्या जातील. 15 व्या वित्त आयोगादरम्यान त्यांच्या स्थापनेसाठी 1000 कोटी रुपये आणि PMKSY च्या विविध घटक योजनांअंतर्गत प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी 920 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. तथापी, ICCVAI आणि FSQAI यांसारख्या योजनेअंतर्गत देशभर प्रस्ताव मागविण्यात येणार आहेत. 

हेही वाचा -  'भगवा दहशतवाद’ म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी माफी मागावी; उमा भारतींची मागणी

सहकारी क्षेत्रासाठी मोठा निर्णय - 

सहकारी क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी एनसीडीसीला बळकटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. NCDC (नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) ला 2000 कोटी रुपयांचे भांडवल मिळणार आहे. या योजनेअंतर्गत, पुढील चार वर्षांसाठी दरवर्षी 500 कोटी रुपयांचे कर्ज दिले जाईल. या अंतर्गत एकूण 20 हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले जाईल. याचा फायदा सुमारे 13 हजार सहकारी संस्था आणि 3 कोटी सदस्यांना होईल.

हेही वाचा - अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लागू; टॅरिफचा शेतकऱ्यांना मोठा फटका

रेल्वे क्षेत्रासाठी मोठा निर्णय - 

या बैठकीत इटारसी आणि नागपूर दरम्यान चौथा मार्ग मंजूर करण्यात आला आहे. त्याच वेळी, अल्याबारी आणि न्यू जलपाईगुडी दरम्यान तिसरा आणि चौथा मार्ग मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर ते प्रभणी मार्ग दुप्पट करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे रेल्वे वाहतूक सुधारेल.


सम्बन्धित सामग्री