Murthal Paratha Viral Bill
हरियाणा: मुर्थल गावाचे नाव ऐकताच डोळ्यासमोर गरमागरम पराठे दिसतात. मुर्थल हे रस्त्यालगतच्या ढाब्यांसाठी प्रसिद्ध आहे जे स्वादिष्ट उत्तर भारतीय पाककृती, विशेषतः पराठ्यासाठी प्रसिद्ध आहे. दिल्ली-चंदीगड महामार्गावर असलेल्या या फूड हबची देशभरात चर्चा आहे. परंतु, आजकाल, मुर्थलचा रेशम ढाबा त्याच्या अद्भुत पराठ्यांसाठी नाही तर 'महागड्या पराठ्यासाठी' सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हो, दिल्लीतील एका ग्राहकाने दावा केला की, या ढाब्यावर त्याला एका पराठ्यासाठी आणि पाण्याच्या बाटलीसाठी 1184 रुपयांचे बिल दिले आहे. सध्या सोशल मीडियावर या बिलाचा फोटो व्हायरल होत आहे.
काय आहे नेमक प्रकरण?
दिल्लीतील एक व्यक्ती मूर्थळमधील रेशम ढाब्यावर पराठा खाण्यासाठी थांबला. त्याने एक पराठा आणि पाण्याची बाटली मागवली. पण जेव्हा बिल आले तेव्हा त्याला मोठा झटका बसला. कारण, बिलात लिहिलेली एकूण रक्कम 1184 रुपये होती. म्हणजेच, दिल्लीत इतक्या पैशात चांगले जेवण करता येते. धक्का बसलेल्या ग्राहकाने ढाब्याच्या मालकाशी चर्चा केली. पण मालकाने कोणतीही सूट देण्यास नकार दिला. संतप्त ग्राहकाने बिलाचा फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला.
हेही वाचा - हुथी बंडखोरांनी मालवाहू जहाजावर घडवून आणला स्फोट! टायटॅनिकसारखे बुडाले जहाज
दरम्यान, जेव्हा हे बिल सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा रेशम ढाब्याचे व्यवस्थापनाने यावर स्पष्टीकरण दिलं. ढाब्याचे व्यवस्थापक मंगत मलिक यांनी म्हटलं आहे की, हा सामान्य पराठा नव्हता, तर 21 इंचाचा 'स्पेशल कॉम्बो पराठा' होता! या पराठ्यात सहा प्रकारच्या भाज्या होत्या आणि त्यासोबत रायता, सॅलड, गुलाब जामुन, खीर आणि चार पापड देखील देण्यात आले होते. हा पराठा 5-6 लोकांसाठी आहे. हा एकच पराठा नव्हता, तर संपूर्ण थाल होता.'
हेही वाचा - किळसवाणा प्रकार! डिलिव्हरीपूर्वी दूध विक्रेता कॅनमध्ये थुंकला; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अटक
व्हायरल बिलावर नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
तथापी, मूर्थळ धाब्याचे हे बिल पाहून वापरकर्त्यांनी X वर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. यातील एका वापरकर्त्याने म्हटलं आहे की, 'फक्त शेतकऱ्याचे पीक स्वस्त आहे, बाकी सर्व काही महाग आहे!' दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटलं आहे की, 'एवढ्या पैशात, संपूर्ण कुटुंब पोटभर पराठे खाऊ शकते आणि त्यावर पानही खाऊ शकते.'