Wednesday, August 20, 2025 10:38:32 AM

Mumbai Mithi River flood Alert : मिठी नदीने धोका पातळी ओलांडली; नागरिकांचं स्थलांतर, भीतीचं वातावरण

मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

mumbai mithi river flood alert  मिठी नदीने धोका पातळी ओलांडली नागरिकांचं स्थलांतर भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. मिठी नदीने विक्राळ धारण केले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून नागरिकांचं स्थलांतर सुरु करण्यात आलं आहे.

मुंबईत सोमवारपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी (19 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे सखल भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एल वॉर्डमधील नागरी अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकांसह, परिस्थिती हाताळण्यासाठी क्रांती नगरजवळील पूरबाधित ठिकाणी पोहोचले आहेत.

हेही वाचा -  Weather Update : मुंबईची पावसाने दाणादाण; लोकल सेवा पूर्णपणे ठप्प; पश्चिम रेल्वेची महत्वाची अपडेट जाणून घ्या

मंगळवारी सकाळी मिठी नदीच्या पाणी पातळीने 3.20 मीटर ओलांडताच, कपाडिया नगरमधील जवळच्या झोपडपट्टीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सध्या नागरिकांचं स्थलांतर केलं जात आहे. रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी 140 हून अधिक झोपडपट्ट्यांचे तात्काळ स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिठी नदीची पातळी 3.8 मीटर इतकी झाली आहे. जवळपास 200 ते 300 झोपडपट्ट्या बाधित भागात आहेत, त्यामुळे तातडीने खबरदारीची कारवाई करणे आवश्यक आहे.

पुराचा धोका असल्याने, स्थानिकांनी स्वतःहून स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती. काहींनी नातेवाईकांकडे आश्रय घेतला, तर काहींनी घराच्या वरच्या मजल्यांवर राहण्यास सुरुवात केली आहे. एल वॉर्डचे सहाय्यक आयुक्त धनाजी हिर्लेकर यांनी सध्या नागरिकांचे जवळच्या महापालिकेच्या शाळेत स्थलांतर करण्यात येत असल्याचे सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर एनडीआरएफ आणि मुंबई अग्निशमन दलाला तात्काळ तैनात करण्यात आले. हिर्लेकर हे स्वतः स्थलांतर प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी आणि आपत्कालीन पथकांशी समन्वय साधण्यासाठी घटनास्थळी उपस्थित होते.

मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे. बचाव कार्य सुरू असताना नागरी कर्मचाऱ्यांनी लाऊडस्पीकरवरून घोषणा दिल्या जात आहेत. अधिकारी अलर्टवर आहेत, पाण्याच्या पातळीचे बारकाईने निरीक्षण करत आहेत आणि गरज पडल्यास अधिक स्थलांतर करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. रहिवाशांना शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. आतापर्यंत 300 नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे, अशी माहिती मिळाली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मिठी नदी परिसराची पाहणी केली. तसेच, अधिकाऱ्यांना नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याच्या सूचना केल्या आहेत. नदीच्या धोक्याची पातळी कमी झाल्याची माहिती एकनाथ शिंदेंनी दिली आहे.

हेही वाचा - Maharashtra Dam : राज्यातील 11 मोठी धरणे पूर्ण भरली; 19 ऑगस्टपर्यंत कुठल्या धरणात पाणी किती?


सम्बन्धित सामग्री