Sunday, August 31, 2025 07:49:01 PM

वडोदरा पूल दुर्घटनेतील 15 मृतदेह सापडले, बचावकार्य अजूनही सुरू

गंभीरा पूल वडोदरा आणि आणंदला जोडतो. त्याच्या कोसळण्याने लाखो लोक प्रभावित झाले आहेत. दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटल्यामुळे लोकांच्या कामावरही परिणाम होत आहे.

वडोदरा पूल दुर्घटनेतील 15 मृतदेह सापडले बचावकार्य अजूनही सुरू
Vadodara Bridge Collapse

गुजरात: गुजरातमधील वडोदरा येथे 9 जुलै रोजी गंभीरा पूल कोसळला. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. वडोदरा जिल्हाधिकारी अनिल धामेलिया अपघातस्थळी पोहोचले आहेत. पथकाचे बचावकार्य अजूनही सुरू आहे. मृतांचा आकडा आता वाढू शकतो असेही वृत्त आहे. वडोदरा येथील महिसागर नदीवर बांधलेला गंभीरा पूल बुधवारी कोसळला होता, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. आज सकाळी पुलाचे ताजे फोटो समोर आले आहेत, जिथे पोलिस कर्मचारी बचावकार्य करताना दिसत आहेत. वडोदरा जिल्हाधिकारी अनिल धामेलिया देखील घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोहोचले आहेत.

हेही वाचा - Delhi NCR Earthquake: दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के; 'इतकी' होती तीव्रता

दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटला - 

गंभीरा पूल वडोदरा आणि आणंदला जोडतो. त्याच्या कोसळण्याने लाखो लोक प्रभावित झाले आहेत. दोन जिल्ह्यांचा संपर्क तुटल्यामुळे लोकांच्या कामावरही परिणाम होत आहे. या अपघाताचे कारण अद्याप कळलेले नाही. परंतु, असं म्हटलं जात आहे की, या पुलाला बराच काळ दुरुस्तीची गरज होती. मात्र, त्याकडे कोणतेही लक्ष देण्यात आले नाही. हा पूल सुमारे 43 वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता, जो 100 गावांमधील लोकांसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे साधन होता. वडोदरा येथील गंभीर पूल दुर्घटनेप्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी बचाव कार्य सुरू आहे. बचाव कार्यादरम्यान एनडीआरएफ पथकाला आणखी एक मृतदेह सापडला आहे, ज्यामुळे मृतांची संख्या 15 झाली आहे.

हेही वाचा - राजस्थानमधील चुरूमध्ये हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; 2 वैमानिकांचा मृत्यू

गंभीरा पूल कधी बांधला होता? 

गंभीरा पूल 1985 मध्ये बांधण्यात आला होता. या पुलाचे वय फक्त 40 वर्षे होते. जेव्हा हा पूल बांधण्यात आला तेव्हा 100 वर्षे या पुलाचे काहीही होणार नाही असे सांगण्यात आले होते. तथापि, कार्यकारी अभियंता एन.एम. नाईकवाला यांनी म्हटलं आहे की, हा पूल जीर्ण अवस्थेत नव्हता. गेल्या वर्षी त्याची दुरुस्ती करण्यात आली होती आणि यावर्षीही खड्डे भरण्यात आले होते. आमच्या तपासणी अहवालात कोणतेही मोठे संरचनात्मक नुकसान दिसून आले नाही. पूल असुरक्षित मानला गेला नव्हता. पूल कोसळण्याचे नेमके कारण सविस्तर अहवाल आल्यानंतरच कळेल.
 


सम्बन्धित सामग्री