कुलगाम जिल्ह्यात सुरू असलेल्या चकमकीत 2 लष्करी जवान हुतात्मे झाले आहेत. तर 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे, अशी माहिती लष्कराने शनिवारी दिली. 1 ऑगस्ट रोजी अखल वनक्षेत्रात सुरू झालेली ही चकमक आता नवव्या दिवशीही सुरूच आहे. ज्यामुळे गेल्या काही वर्षांत खोऱ्यातील ही सर्वात मोठी दहशतवादविरोधी कारवाई ठरली आहे. या कारवाईदरम्यान आणखी दोन सैनिक जखमी झाले आहेत.
"चिनार कॉर्प्स कर्तव्य बजावताना लेफ्टनंट नाईक प्रितपाल सिंग आणि सेप हरमिंदर सिंग यांच्या सर्वोच्च बलिदानाचा सन्मान करते. त्यांचे धाडस आपल्याला कायमच प्रेरणा देईल", असे सेनेने एक्सवर पोस्ट केले असून शोकग्रस्त कुटुंबांना संवेदना व्यक्त केली आहे. या मोहिमेवर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवणारे डीजीपी नलिन प्रभात म्हणाले की, कठीण भूभाग आणि घनदाट जंगलामुळे विलंब होत आहे.
हेही वाचा - मोदींकडून लाडक्या बहिणींना बारा हजार कोटींची ओवाळणी
पाच दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांना ही कारवाई सुरू केली, ज्यात जंगल युद्धाचे प्रशिक्षण घेतलेले किमान तीन परदेशी अतिरेकी समाविष्ट आहेत. उर्वरित अतिरेक्यांना संपवण्यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टर आणि पॅरा कमांडो तैनात करण्यात आले आहेत. 22 एप्रिल रोजी 26 जणांचा बळी घेणाऱ्या पहलगाम हल्ल्यातील तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना श्रीनगरच्या वरच्या भागात मारण्यात आल्यानंतर काही दिवसांनी कुलगाम चकमक घडली.