Saturday, September 06, 2025 04:42:23 PM

आईचा अनोखा त्याग; वयाच्या 52व्या वर्षी सासू बनली जावयाच्या बाळाची जननी!

आई म्हणून आपल्या मुलीच्या वेदना पाहवत नसल्याने क्रिस्टी यांनी सरोगसीद्वारे बाळ जन्माला घालण्याचा मोठा निर्णय घेतला. हे निर्णय त्यांच्यासाठी सहज नव्हता

आईचा अनोखा त्याग वयाच्या 52व्या वर्षी सासू बनली जावयाच्या बाळाची जननी

प्रेम, त्याग आणि मातृत्वाची भावना याचं उत्तम उदाहरण अमेरिकेतील एका महिलेने घडवून दाखवलं आहे. आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका आईने स्वतःच्या वयाकडे दुर्लक्ष करत तिच्या जावयाच्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. ही अनोखी कहाणी सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

क्रिस्टी श्मिट या 52 वर्षीय महिलेने आपल्या मुलीच्या आयुष्यात आनंद भरण्यासाठी सरोगसीद्वारे जावयाच्या बाळाला जन्म दिला आहे. क्रिस्टी यांची मुलगी हेईडी आणि जावई जॉन यांना अनेक प्रयत्नांनंतरही अपत्यसुख लाभत नव्हतं. वैद्यकीय उपचारांनीही अपयश आल्यानंतर त्यांनी सरोगसीचा विचार केला.

हेईडीला गर्भधारणेसंबंधी अवघड समस्या असल्याने तिच्या जीवाला धोका असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आई म्हणून आपल्या मुलीच्या वेदना पाहवत नसल्याने क्रिस्टी यांनी सरोगसीद्वारे बाळ जन्माला घालण्याचा मोठा निर्णय घेतला. हे निर्णय त्यांच्यासाठी सहज नव्हता, परंतु आपल्या मुलीच्या आनंदासाठी त्यांनी हा त्याग करण्याचं ठरवलं.

हेही वाचा: विद्येच्या माहेरघरात कोयता गँगचा थरार – आता घरात घुसून दहशत!

क्रिस्टी श्मिट यांनी सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या. डॉक्टरांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्यांनी IVF प्रक्रियेस सुरुवात केली. भ्रूण प्रत्यारोपण यशस्वी झाल्यानंतर क्रिस्टी गर्भवती झाल्या. या नऊ महिन्यांच्या प्रवासात संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठिशी उभं राहिलं. अखेर त्यांनी निरोगी बाळाला जन्म दिला आणि आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण केलं.

या घटनेत विशेष म्हणजे क्रिस्टी यांनी आपल्या जावयाच्या बाळाला जन्म देऊन एकाच वेळी आई आणि आजी होण्याचा मान मिळवला. मुलीचं मातृत्वाचं स्वप्न पूर्ण झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.


 


सम्बन्धित सामग्री