Thursday, August 21, 2025 02:56:24 AM

Murder Case: जालन्यात सुनेने केली सासूची हत्या

जालना जिल्ह्यातील प्रियदर्शनी कॉलनीत धक्कादायक प्रकार घडला आहे.

murder case जालन्यात सुनेने केली सासूची हत्या

जालना : जालना जिल्ह्यातील प्रियदर्शनी कॉलनीत धक्कादायक प्रकार घडला आहे. सुनेने सासूची हत्या केली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

सासू सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जालन्यात सुनेनं सासूची हत्या करून मृतदेह एका गोणीत भरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सविता संजय शिनगारे असं या मयत महिलेचं नाव आहे. जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात असणाऱ्या प्रियदर्शनी काॅलनीतील ही घटना आहे. सासूची भिंतीवर डोक आपटून हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर सुनेने मृतदेह गोणीत टाकला. सासूचा गोणीत भरलेला मृतदेह उचलता आला नसल्यामुळे सून तिथेच मृतदेह सोडून फरार झाली आहे. घरमालकाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर हत्या प्रकरणाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दरम्यान फरार आरोपी सुनेचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सासू सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. 

हेही वाचा : पन्हाळा किल्ला जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यास पन्हाळावासियांचा विरोध

सूनेच्या हातून सासूचा खून
जालन्यातील सुनेने सासूची हत्या केली आहे. भिंतीवर डोके आपटून सुनेने सासूचा खून केला. त्यानंतर तिने सासूचा मृतदेह एका गोणात भरला. गोणीत भरलेला मृतदेहाचे वजन जास्त होते. त्यामुळे सुनेला मृतदेह न उचलल्याने तिने तो जागीच ठेवून तिथून धूम ठोकली. हा प्रकार रूम मालकाच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्याने पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. सासूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला. पोलिस सदर प्रकरणाचा शोध घेत आहेत. 

दरम्यान सासूचा खून करून तिला गोणीत भरून पळून गेलेल्या सुनेचा शोध लागला आहे. सदर प्रकरणातील सुनेला पोलिसांनी परभणीतून ताब्यात घेतलं आहे. 

 

 


सम्बन्धित सामग्री