Monday, September 01, 2025 07:37:57 PM

OMG! पोटदुखीने त्रस्त असलेल्या तरुणाने युट्यूब पाहून केली स्वतःवरचं शस्त्रक्रिया; प्रकृती गंभीर

ऑपरेशनसाठी त्याने मेडिकल स्टोअरमधून सुन्न करणारे इंजेक्शन, ब्लेड आणि इतर वस्तू आणल्या. शस्त्रक्रियेनंतर त्याने पोटावर 11 टाकेही घातले.

omg पोटदुखीने त्रस्त असलेल्या तरुणाने युट्यूब पाहून केली स्वतःवरचं शस्त्रक्रिया प्रकृती गंभीर
Man Performed operation himself after watching YouTube
Edited Image

मथुरेतील वृंदावनमध्ये पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका तरुणाने असे कृत्य केले की, ते पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. या तरुणाने युट्यूबवर पाहून स्वतःचे ऑपरेशन केले. ऑपरेशनसाठी त्याने मेडिकल स्टोअरमधून सुन्न करणारे इंजेक्शन, ब्लेड आणि इतर वस्तू आणल्या. शस्त्रक्रियेनंतर त्याने पोटावर 11 टाकेही घातले. यानंतर, जेव्हा त्याची प्रकृती बिघडली तेव्हा तो वेदनेने ओरडू लागला. कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

यूट्यूबवर पाहून केलं ऑपरेशन - 

सुनरख येथील रहिवासी 32 वर्षीय राजाबाबू घरी एकटेच राहतात. बीबीएचे शिक्षण घेतलेले राजाबाबू शेतकरी आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. वेदनेने त्रस्त होऊन त्यांनी स्वतःच्या पोटावर शस्त्रक्रिया केली. यासाठी त्यांनी प्रथम यूट्यूबवर पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या आवश्यक उपकरणांची पाहणी केली आणि ऑपरेशनसाठी मथुरा येथील एका मेडिकल स्टोअरमधून ब्लेड, भूल देण्याचे इंजेक्शन, शिलाईसाठी सुई आणली.

हेही वाचा - माकडानं दीड लाखांचा मोबाईल फोन पळवला; 'बिरबलाच्या बुद्धीनं केली युक्ती', व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल हसू

प्लास्टिकच्या धाग्याचा वापर करून घेतले 11 टाके - 

बुधवारी दुपारी घरी पोटाचे ऑपरेशन केल्यानंतर, त्यांनी प्लास्टिकच्या धाग्याने 11 टाके घेतले. यानंतर, जेव्हा पोटदुखी असह्य झाली, तेव्हा त्यांनी कुटुंबातील सदस्यांना स्वत: शस्त्रक्रिया केल्याचं सांगितलं. त्यानंतर राजाबाबूंना त्यांचा पुतण्या राहुल ठाकूर जिल्हा संयुक्त रुग्णालयात घेऊन गेला. त्याने स्वतः ऑपरेशन केल्याचं ऐकल्यानंतर डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. राजाबाबूंना प्राथमिक उपचार दिल्यानंतर त्यांना आग्रा एसएन रुग्णालयात रेफर करण्यात आले. 

हेही वाचा - 'पुरुषांना दर आठवड्याला 2 बाटल्या मोफत दारू द्यावी'; विधानसभेत 'या' आमदाराने केली विचित्र मागणी

दरम्यान, जिल्हा संयुक्त रुग्णालयाचे डॉ. शशी रंजन यांनी सांगितले की, राजाबाबूंचे 15 वर्षांपूर्वी अपेंडिक्स ऑपरेशन झाले होते. त्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून त्याला वेदना होत असल्याने, त्याने त्याच्या पोटात सात सेंटीमीटरचा चीरा टाकला आणि नंतर टाके घातले. यामुळे पोटात संसर्ग पसरू शकतो. त्यांना उपचारासाठी आग्रा येथे रेफर करण्यात आले आहे.
 


सम्बन्धित सामग्री