Thursday, August 21, 2025 12:08:07 AM

पंतप्रधान मोदींच्या छत्तीसगड दौऱ्यापूर्वी नक्षलवादाविरोधात मोठे यश! विजापूरमध्ये 50 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण

विजापूर जिल्ह्यात 50 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, त्यापैकी 14 जणांवर एकूण 68 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.

पंतप्रधान मोदींच्या छत्तीसगड दौऱ्यापूर्वी नक्षलवादाविरोधात मोठे यश विजापूरमध्ये 50 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण
Naxalites Surrender In Bijapur
Edited Image

Naxalites Surrender In Bijapur: पंतप्रधान मोदींच्या छत्तीसगड दौऱ्यापूर्वी, नक्षलवादाचा नायनाट करण्यात गुंतलेल्या सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. रविवारी, विजापूर जिल्ह्यात 50 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, त्यापैकी 14 जणांवर एकूण 68 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, नक्षलवाद्यांनी राज्य पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आपले शस्त्र आत्मसमर्पण केले.

बिजापूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी उभारलेल्या छावण्या आणि 'निया नेलनार' योजनेमुळे ते प्रभावित झाले. या योजनेअंतर्गत सुरक्षा दल आणि प्रशासन दुर्गम भागात मूलभूत सुविधा पुरवत आहे. शरणागती पत्करलेल्या 50 जणांपैकी सहा जणांवर प्रत्येकी 8 लाख रुपयांचे बक्षीस, तिघांवर प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस आणि पाच जणांवर प्रत्येकी 1 लाख रुपयांचे बक्षीस होते. 

हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मध्ये उल्लेख केलेले MY-Bharat कॅलेंडर काय आहे? जाणून घ्या

दरम्यान, जिल्हा राखीव रक्षक (DRG), बस्तर फायटर्स, स्पेशल टास्क फोर्स (STF), CRPF आणि त्यांची एलिट युनिट COBRA (कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन) यांनी त्यांच्या आत्मसमर्पणात महत्त्वाची भूमिका बजावली, असंही जितेंद्र कुमार यादव यांनी सांगितलं. चळवळ सोडून मुख्य प्रवाहात सामील होणाऱ्या नक्षलवाद्यांचे सरकारी धोरणानुसार पुनर्वसन केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्य भेटीच्या काही तास आधी हे आत्मसमर्पण झाले आहे. 

हेही वाचा - गरिबाचा मुलगा डॉक्टर बनावा म्हणून डॉक्टर बनण्याची सुविधा उपलब्ध; नागपूर दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदींचे उद्गार?

सुकमा आणि विजापूरमध्ये झालेल्या चकमकीत 18 नक्षलवादी ठार  - 

छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशातील सुकमा आणि विजापूर जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांनी 18 नक्षलवाद्यांना ठार केले, ज्यामध्ये 11 महिलांचा समावेश आहे. 31 मार्च 2026 पूर्वी नक्षलवादाचा समूळ नाश करण्याच्या मोहिमेतील हे एक मोठे यश मानले जात आहे. 
 


सम्बन्धित सामग्री