Wednesday, August 20, 2025 07:23:38 PM

Jaipur Blast Case: जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा

या प्रकरणात न्यायालयाने 600 पानांचा निकाल दिला आहे. दुसरीकडे, सरकारने 112 पुरावे, 1192 कागदपत्रे, 102 लेख आणि 125 पानांचे लेखी वादविवाद सादर केले आहेत.

jaipur blast case जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा
Jaipur Blast Case
Edited Image, प्रतिकात्मक प्रतिमा

Jaipur Blast Case: जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. या प्रकरणातील सर्व दोषींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सुमारे 17 वर्षांपूर्वी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांदरम्यान सापडलेल्या जिवंत बॉम्ब प्रकरणात न्यायालयाने दोन दिवसांपूर्वी या चौघांनाही दोषी ठरवले होते. या प्रकरणात न्यायालयाने 600 पानांचा निकाल दिला आहे. दुसरीकडे, सरकारने 112 पुरावे, 1192 कागदपत्रे, 102 लेख आणि 125 पानांचे लेखी वादविवाद सादर केले आहेत.

जयपूर साखळी बॉम्बस्फोट - 

दरम्यान, निकाल जाहीर होण्यापूर्वीच, सुरक्षेच्या कारणास्तव राजस्थान पोलिसांनी न्यायालयाच्या परिसराचे छावणीत रूपांतर केले. 13 मे 2008 रोजी जयपूरमध्ये 8 साखळी स्फोट झाले होते, नववा बॉम्ब चांदपोल बाजारातील गेस्ट हाऊसजवळ सापडला होता, जो स्फोटाच्या फक्त 15 मिनिटे आधी निकामी करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने सरवर आझमी, मोहम्मद सैफ, सैफुर्रहमान, शाहबाज यांना दोषी ठरवले होते. आज त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

हेही वाचा - भाजप नेते मनोरंजन कालिया यांच्या घरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी 2 आरोपींना अटक; बिश्नोई-ISI संबंध असल्याचा संशय

आरोपींना फाशीची शिक्षा - 

तथापी, डिसेंबर 2019 मध्ये जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सरवर आझमी, मोहम्मद सैफ, मोहम्मद सलमान आणि सैफुर्रहमान यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याच वेळी, पाचवा आरोपी शाहबाज याला  निर्दोष मुक्त करण्यात आले. शिक्षा झालेल्या चौघांनी उच्च न्यायालयात शिक्षेला आव्हान दिले. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 29 मार्च 2023 रोजी चौघांनाही निर्दोष मुक्त केले आणि शाहबाज हुसेन यांच्या निर्दोष मुक्ततेला मान्यता दिली.

हेही वाचा - 26/11 चा सूत्रधार अखेर भारताच्या तावडीत? तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावरून अमेरिकन न्यायालयाचा मोठा निर्णय

जयपूर साखळी बॉम्बस्फोटोत 71 जणांचा मृत्यू - 

13 मे 2008 रोजी जयपूर बॉम्बस्फोटोची घटना घडली होती. या दिवशी जयपूर शहरात सलग आठ बॉम्बस्फोट झाले. यानंतर, चांदपोळ बाजारजवळ नववा बॉम्ब सापडला, जो निकामी करण्यात आला. जयपूरच्या मानक चौक खांडा, चांदपोळ गेट, बडी चौपद, छोटी चौपद, त्रिपोलिया गेट, जोहरी बाजार आणि सांगणेरी गेट येथे एकामागून एक बॉम्बस्फोट झाले. या बॉम्बस्फोटांमध्ये 71 जणांचा मृत्यू झाला आणि 180 जण जखमी झाले.
 


सम्बन्धित सामग्री